MI vs DC : मुंबई सहाव्या सामन्यासाठी सज्ज, दिल्ली पराभवाची परतफेड करणार का?

Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women WPL 2026 Preview : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघांची चौथ्या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. मुंबई दिल्ली विरुद्ध सलग दुसऱ्यांदा जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

MI vs DC : मुंबई सहाव्या सामन्यासाठी सज्ज, दिल्ली पराभवाची परतफेड करणार का?
Delhi Capitals Women vs Mumbai Indians WPL 2026
Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Jan 20, 2026 | 2:47 AM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील (WPL 2026) 13 व्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. मुंबईचा हा या मोसमातील सहावा आणि तर दिल्लीचा पाचवा सामना असणार आहे. मुंबईला या मोसमात 2 विजयानंतर सातत्य राखण्यात अपयश आलं. तर दिल्ली पूर्णपणे भरकटलीय. त्यामुळे दोन्ही संघांचा मंगळवारी 20 जानेवारी रोजी  होणार्‍या या सामन्यात विजय मिळवून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता या सामन्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची कामगिरी

मुंबईने या मोसमात 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने गमावले आहेत. मुंबईने पराभवाने सुरुवात झाल्यांनतर सलग 2 सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं. मात्र मुंबई सातत्य राखण्यात अपयशी ठरली आणि सलग 2 सामने गमावले. तर दिल्लीने पहिले 2 सामने गमावल्यानंतर मोहिमेतील तिसरा सामना जिंकून पहिला विजय मिळवला. मात्र चौथ्या सामन्यात पुन्हा दिल्ली पराभूत झाली. ताज्या आकडेवारीनुसार मुंबई 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर दिल्ली पाचव्या अर्थात शेवटून पहिल्या स्थानी आहे.

दिल्ली गेल्या पराभवाची वसुली करणार?

दिल्ली कॅपिट्ल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ 10 जानेवारीला आमनेसामने आले होते. तेव्हा मुंबईने दिल्लीवर 50 धावांनी दणदणीत असा विजय मिळवला होता. त्यामुळे आता दिल्लीकडे मंगळवारी मुंबईवर मात करुन विजयी ट्रॅकवर परतण्यासह गेल्या पराभवाची वसुली करण्याची दुहेरी संधी आहे. त्यात आता दिल्ली यशस्वी ठरणार की मुंबई या मोसमातील एकूण तिसरा आणि दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय मिळवण्यात यशस्वी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्लीची नवनियुक्त कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्स हीला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. तर मुंबईची अनुभवी कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला सातत्य राखण्यात अपयश आलंय. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात 2 कर्णधारांमध्येही सामना पाहायला मिळणार आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याबाबत महत्त्वाचं

दरम्यान दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याला मंगळवारी 20 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवरुन मॅच लाईव्ह पाहता येईल.