
वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील चौथ्या मोसमातील 10 व्या मोसमात गतविजेता मुंबई इंडियन्स आपला पाचवा सामना हा शनिवारी 17 जानेवारीला खेळणार आहे. मुंबईसमोर या मोसमात सलग दुसऱ्यांदा यूपी वॉरियर्सचं आव्हान असणार आहे. युपीने गेल्या सामन्यात सलग 2 सामने जिंकणाऱ्या मुंबईला पराभूत करत या मोसमतील विजयाचं खातं उघडलं होतं. त्यामुळे आता मुंबईकडे गेल्या पराभवाची परतफेड करुन तिसरा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यूपी वॉरियर्स पुन्हा मुंबईला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई आणि यूपीचा हा चौथ्या मोसमातील एकूण पाचवा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या मोसमातील सुरुवात पराभवाने झाली. मुंबईने पहिल्या पराभवानंतर जोरदार मुसंडी मारत सलग 2 सामने जिंकले. तर सलग 3 सामने गमावणाऱ्या युपीने मुंबईला गुरुवारी 15 जानेवारीला पराभूत करत विजयी हॅट्रिक करणापासून रोखलं आणि पहिला विजय साकारला. युपीने मुंबईवर 7 विकेट्सने विजय मिळवला. युपीने 162 धावांचं आव्हान हे 11 बॉलआधी 7 विकेट्स राखून पूर्ण केलं. त्यानंतर आता 48 तासांच्या आत हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे पलटण हिशोब करणार की पुन्हा युपी वॉरियर्स पुन्हा मैदान मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना शनिवारी 17 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.
युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे सामना मोबाईल-लॅपटॉपवर पाहता येईल.
दरम्यान युपी वॉरियर्स पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या आणि सर्वात शेवटी विराजमान आहे. युपी 1 विजय आणि 2 गुंणासह पाचव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईप्रमाणे गुजरात जायंट्सचेही 4 गुण आहेत. मात्र गुजरातपेक्षा नेट रनरेट भारी असल्याने मुंबईने दुसऱ्या स्थानी आहे.