
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला (WPL 2026) दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Mumbai Indians Women vs Royal Challengers Bengaluru) आमनेसामने आहेत. मोसमातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. पहिल्याच सामन्यात मुंबईच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला. आरसीबी कर्णधार स्मृती मंधाना हीने टॉस जिंकला आहे. स्मृतीने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तर मुंबईला या सामन्याआधीच तगडा झटका लागला आहे.
मुंबईला पहिल्या सामन्याआधीच मोठा झटका लागला आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात प्रमुख खेळाडूशिवाय उतरावं लागणार आहे. मुंबई पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज हीच्याशिवाय मैदानात उतरणार आहे. हेलीची तब्येत ठीक नसल्याने ती निवडीसाठी उपलब्ध नव्हती, अशी माहिती कर्णधार हरमनप्रीत कौर हीने टॉसनंतर दिली. हेलीच्या जागी निकोला केरी हीचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.निकोलाचं यासह डब्ल्यूपीएल स्पर्धेत पदार्पण झालं आहे. त्यामुळे निकोला पदार्पणात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
क्रिकेट चाहत्यांचं या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या कर्णधार-फलंदाज जोडीकडे बारीक लक्ष असणार आहे. या दोघी नेतृत्वाच्या जबाबदारीसह फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भारताने डब्ल्यूपीएलआधी झालेल्या शेवटच्या टी 20I मालिकेत श्रीलंकेचा 5-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला होता. त्यामुळे टी 20Iनंतर डब्ल्यूपीएलमध्ये दोघींपैकी कोण सातत्य राखण्यात यशस्वी ठरतं हे लवकरच स्पष्ट होईल.
मुंबई-आरसीबी पहिल्या सामन्यासाठी सज्ज
Season 4⃣. Episode 1⃣
💙 🆚 ❤️
Bring on the #TATAWPL 2026 🥳
Updates ▶️ https://t.co/IWU1URl1fr#KhelEmotionKa | #MIvRCB pic.twitter.com/4u5OinBMp0
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 9, 2026
वूमन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, ऋचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, नादिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, प्रेमा रावत, लिन्से स्मिथ आणि लॉरेन बेल.
वूमन्स मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, जी कमलिनी (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, निकोला केरी, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजीवन सजना आणि सायका इशाक.