AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar IPL 2023 : अंपायरने तोडला नियम, अर्जुन तेंडुलकरवर झाला असता मोठा अन्याय

Arjun Tendulkar IPL 2023 : आयपीएल मॅचमध्ये तीन-तीन अंपायर असताना अशी चूक कशी होऊ शकते? एकवेळ मैदानावरील अंपायर चुकू शकतात. पण तिसऱ्या अंपायरच लक्ष असलं पाहिजे. अंपायरकडून अशी चूक अपेक्षित नाहीय.

Arjun Tendulkar IPL 2023 : अंपायरने तोडला नियम, अर्जुन तेंडुलकरवर झाला असता मोठा अन्याय
IPL 2023 arjun tendulkar
| Updated on: Apr 26, 2023 | 9:01 AM
Share

GT vs MI IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये असं काही घडलं, की प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. महत्वाच म्हणजे हे सर्व तीन अंपायर असताना घडलं. अंपायरने लक्ष दिलं नाही, त्यामुळे नियमाच उल्लंघन झालं. मुंबई इंडियन्सचा अर्जुन तेंडुलकर तिसरी ओव्हर टाकत होता.

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्याच ओव्हरमध्ये अर्जुनने मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं. त्याने ऋद्निमान साहाला बाद केलं.

नेमकं काय चुकलं?

तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अर्जुन तेंडुलकरने लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. साहाने हा चेंडू फाइन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो चूकला. चेंडू विकेटकीपर इशान किशनच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. मुंबई इंडियन्सने अपील केलं. अंपायरने साहाला आऊट दिलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण साहाने रिव्यू घ्यायचा निर्णय घेतला. त्यासाठी तो गिलशी बोलत होता. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

अंपायर असं कसं दुर्लक्ष करु शकतात?

दोघे बोलत असताना रिव्यूचा टायमर सुरु होता. हा टायमर 0 वर आला. त्यानंतर साहाने रिव्यूचा इशारा केला. नियमानुसार टायमर 0 वर असल्यास रिव्यूसाठी अपील करता येत नाही. यावर मैदानातील पंच आणि तिसऱ्या अंपायरच लक्ष असण गरजेच होतं. त्यांनी चेक करायला पाहिजे होतं. पण दोघांनी याकडे दुर्लक्ष केलं व साहाला रिव्यूची परवानगी दिली. रिव्यूमध्ये साहा out होता. वेळ निघून गेली होती

आता प्रश्न हा आहे की, टायमर 0 वर आला, त्यावेळी अंपायरच लक्ष का नव्हतं? एकवेळ मैदानावरील पंच चुकू शकतात. पण तिसऱ्या अंपायरसमोर सर्वकाही असतं. मग तिसऱ्या अंपायरने टायमर का नाही पाहिला? अंपायरच्या चूकीमुळे अर्जुनवर अन्याय झाला असता. कारण रिव्यूसाठी अपील करायची वेळ निघून गेली होती.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.