“टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या जाळ्यात…”, पॉटिंगने रोहित शर्मा आणि द्रविडला प्लेइंग इलेव्हनवरून फटकारलं

| Updated on: Jun 07, 2023 | 8:43 PM

WTC 2023 IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. त्यामुळे गोलंदाजांवर दबाव दिसत आहेत.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या जाळ्यात..., पॉटिंगने रोहित शर्मा आणि द्रविडला प्लेइंग इलेव्हनवरून फटकारलं
"टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या जाळ्यात...", पॉटिंगने रोहित शर्मा आणि द्रविडला प्लेइंग इलेव्हनवरून फटकारलं
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरश: दमछाक केली. विकेट मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. यामुळे प्लेइंग इलेव्हनबाबत कर्णधार रोहित शर्मा टीकेचा धनी ठरला आहे. आजी माजी खेळाडूंनी रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या रणनितीवर टीका केली आहे. कारण प्लेइंग इलेव्हनमध्ये आर. अश्विन नसल्याने आता टीका होऊ लागली आहे.

नाणेफेकीचा कौल झआल्यानंतर रोहित शर्माने संघात आर. अश्विन नसल्याचं सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्याऐवजी संघात रवींद्र जडेजाला स्थान दिलं. तसेच मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर आणि उमेश यादवला संघात स्थान देण्यात आलं आहे.

रिकी पॉटिंगने रोहित शर्माच्या प्लेइंग इलेव्हनवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “रोहित शर्माने ही टीम फक्त पहिल्या इनिंगसाठी निवडली आहे.”, असं रिकी पॉटिंगने समालोचनावेळी सांगितलं. “आर. अश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजापेक्षा चांगली गोलंदाजी केली असती.”असंही त्याने पुढे सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ