WTC Final Weather Update : चौथ्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु असलेल्या इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानातील हवामानाचे ताजे फोटो समोर आले आहेत. भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्यात हवामानाचे अड़थळे सतत दिसून येत आहेत.

WTC Final Weather Update : चौथ्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर
southampton weather

WTC Final Weather Update : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्य दिवशीचा संपूर्ण खेळ पाऊस असल्यामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर खराब प्रकाशमानामुळे पंचांनी खेळ 64.4 ओव्हरनंतर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने तोवर 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी वातावरण चांगले असल्याने भारताचा संपूर्ण डाव 92.1 ओव्हरचा झाल्आनंतर न्यूझीलंड संघ देखील 49 ओव्हर खेळू शकला. न्यूझीलंड 116 धावांनी पिछाडीवर असला तरी केवळ दोनच विकेट गमावल्याने आजचा दिवस सामन्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्यातच साऊदम्पटनमधील हवामानाच्या ताज्या फोटोतून आजच्या खेळावरही पावसाचं संकट घोंगावत असल्याचं समोर आलं आहे. (WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand WTC Dinesh Karthik Shares Latetes Photos Of Southampton ground)

पुन्हा दिनेशनेच दिली माहिती

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरुहोण्यापूर्वी हवामानाची स्थिती सर्वात आधी भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो सद्या कॉमेन्ट्री करण्यासाठी इंग्लंडला आहे त्यानेच दिली होती. दिनेशने मैदानाचे ताजे फोटो शेअर करत तेथे सूर्य उगवला असून आजचा खेळ होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आजही दिनेशनेच मैदानाचे फोटो शेअर करत ‘हवामान तितके खास नाही’ असे कॅप्शनही दिले आहे.

बीसीसीआयनेही शेअर केले फोटो

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या ट्विटरवरुन मैदानाचे ताजे फोटो शेअर केले आहेत. सामना सुरु होण्याला काही मिनिटं शिल्लक असताना साऊदम्पटनची स्थिती अशी आहे. असं सांगत बीसीसीआयने हे फोटो शेअर केले आहेत.

सामन्यावर किंवींची पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्यातरी न्यूझीलंड सरसआहे.

संबंधित बातम्या

WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand WTC Dinesh Karthik Shares Latetes Photos Of Southampton ground)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI