Ajinkya Rahane Birthday | अजिंक्य रहाणे याचा 35 वा वाढदिवस, खडतर काळ आणि जोरदार मुसंडी, टीम इंडियाला बर्थडे गिफ्ट देणार?

| Updated on: Jun 06, 2023 | 7:17 PM

अजिंक्य रहाणे याने माजी कर्णधार विराट कोहली याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला 2 वर्षांपूर्वी आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात विजयी केलं होतं. जाणून घ्या रहाणेच्या गेल्या काही महिन्यामधील संघर्षमय प्रवासाबाबत.

Ajinkya Rahane Birthday | अजिंक्य रहाणे याचा 35 वा वाढदिवस, खडतर काळ आणि जोरदार मुसंडी, टीम इंडियाला बर्थडे गिफ्ट देणार?
Follow us on

मुंबई | टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याचा आज 35 वा वाढदिवस आहे. रहाणेने टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार आणि उपकर्णधार या जबाबदाऱ्या सार्थपणे पार पाडल्या आहेत. रहाणेची कसोटी कर्णधार म्हणून आकडेवारी लाजवाब आहे. रहाणेने आपल्या नावाप्रमाणे आपल्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला अजिंक्य ठेवलंय. मात्र रहाणेसाठी गेली 2 वर्ष ही फार चढ-उताराची राहिली. रहाणेला या 2 वर्षांच्या पडत्या काळात संघर्षाचा सामना करावा लागला. मात्र रहाणेने न खचता जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा बीसीसीआयला टीम इंडियात घ्यायला भाग पाडलं. रहाणेच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत आणि संघर्षाबाबत जाणून घेऊयात.

डच्चू ते कमबॅक

रहाणेने अखेरचा कसोटी सामना हा 11 जानेवारी 2022 रोजी खेळला होता. त्यानंतर रहाणेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना निवड समितीने बाहेर काढलं. मात्र पुजाराने कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळवलं. मात्र रहाणे आपला एकटा लढत राहिला.

रहाणेने या दरम्यानच्या काळात देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमधून उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियाने या दरम्यान अनेक कसोटी मालिका खेळल्या. मात्र निवड समितीने रहाणेचा विचार केला नाही. मात्र रहाणेने न डगमगून जाता आपले प्रयत्न सुरुच ठेवले. रहाणेची कुठेच काही चर्चा नव्हती. रहाणे लढत होता.

हे सुद्धा वाचा

या दरम्यान रहाणेला दुसरा झटका लागला. बीसीसीआयने वार्षिक करार जाहीर केला. बीसीसीआयने रहाणेला या वार्षिक करारातून वगळलं. त्यामुळे आता रहाणेचं कसोटी कारकीर्द संपल्याचं म्हटंल जात होतं. रहाणे म्हणजे टेस्ट प्लेअर, रहाणे म्हणजे दुसरा द्रविड अशी ओळख. त्यामुळे आता रहाणेची पुन्हा एन्ट्री होत नाही, असा सूर आवळला जात होता. मात्र रहाणेने टीकाकारांना चोख उत्तर दिलं.

रहाणेने आयपीएल 16 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून धमाकेदार कामगिरी केली. क्रिकेट चाहत्यांना रहाणेचं आयपीएल 16 व्या मोसमात दुसरं रुप पाहायला मिळालं. रहाणेला आयपीएल दरम्यान गूडन्यूज मिळाली. रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर रहाणेची कामगिरी आणखी बहरली. रहाणे आयपीएलमध्ये धमाका घातला.

अजिंक्यची कसोटी कारकीर्द

अजिंक्यने एकूण 82 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अंजिक्यने 140 डावांमध्ये 12 शतकं आणि 25 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार 931 धावा केल्या आहेत.

अजिंक्यची कर्णधार म्हणून आकडेवारी

अजिंक्यने त्याच्या कसोटी कारकीर्दीत एकूण 6 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केलीय. उल्लेखनीय बाब अशी की टीम इंडियाचा 6 पैकी एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. अजिंक्यने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 4 सामन्यात विजय मिळवून दिलाय. तर 2 सामने ड्रॉ राहिले आहेत. विशेष म्हणजे यातील 6 पैकी 4 सामने हे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील आहेत. ज्यातील 3 सामन्यात भारताचा विजय झाला होता.

रहाणेचं शतक विजयाची हमी

दरम्यान रहाणेचं शतक हे टीम इंडियासाठी विजयाची हमी देणारं ठरलंय. रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलंय तेव्हा तेव्हा टीम इंडियाचा विजय झालाय किंवा सामना अनिर्णित राहिलाय. रहाणेने 12 कसोटी शतक ठोकलीत. या 12 पैकी 9 सामन्यात टीम इंडियाचा विजय झालाय. तर 3 सामने अनिर्णित राहिलीत. रहाणेची इंग्लंडमधील कामगिरी सॉल्लिड आहे. त्यामुळे आता रहाणेकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये अशाच कामगिरीची अपेक्षा असणआर आहे. यामुळे रहाणे टीम इंडियाला बर्थडे गिफ्ट देणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.