
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे इंग्लंडमधील ओव्हल ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. या महामुकाबल्यासाठी आधी ऑस्ट्रेलिया त्यानंतर टीम इंडियाने संघ जाहीर केला. श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत हे तिन्ही स्टार खेळाडू यांना भारतीय संघात संधी मिळाली नाही. श्रेयस आणि बुमराह हे दोघे दुखापतीतून सावरत आहेत.
तर ऋषभही हळूहळू अपघातातून सावरतोय. त्यामुळे संघात विकेटकीपर म्हणून केएस भरत याचा समावेश करण्यात आला आहे. तर केएल राहुल हा देखील विकेटकीपिंग करतो. यामुळे या महत्वाच्या सामन्यात विकेटकीपिंग कोण करणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मात्र या दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचंही नाव विकेटकीपिंगसाठी समोर आलं आहे.
केएस की केएल, या दोघांपैकी विकेटकीपर म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळायला हवी, असा सवाल रवी शास्त्री यांना विचारण्यात आला. तसेच या दरम्यान विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंह धोनी याच्याबाबतही सवाल विचारण्यात आला. यावर शास्त्री यांनी चित्तवेधक उत्तर दिलं.आपल्याला धोनीला निवृत्ती मागे घेण्यासाठी आवाहन करायला हवं. कारण तो फीट वाटतोय आणि आताही शानदार विकेटकीपिंग करतोय.
यावर शास्त्री उत्तर देताना म्हणाले की, “निश्चितपणे हो. धोनीने आपल्या युवा खेळाडूंना आयपीएलच्या माध्यमातून विकेटकीपिंग कशी करायची याबाबत दाखवून दिलं. धोनी कधी रेकॉर्डसाठी खेळला नाही. धोनीने जेव्हा कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याला निर्णय बदलण्यापासून कोणीही रोखू शकला नव्हता.”
मात्र धोनी आता असं करणार नाही. कारण धोनी घेतलेला निर्णय केव्हाही बदलत नाही. धोनीने कसोटी क्रिकेट सोडलं तेव्हा तो 100 सामन्यांपासून 10 कसोटी दूर होता. धोनी तेव्हा चमकदार कामगिरी करत होता. मात्र धोनीने निवृत्ती घेतली आणि युवा चेहऱ्यांना संधी उपलब्ध करुन दिली. धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतली होती. तर 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.