Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियामध्ये निवड

अखेर अजिंक्य रहाणे याच्यासमोर बीसीसीआय झुकलंच. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी अजिंक्य रहाणे याची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा महामुकाबला खेळणार आहे.

Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियामध्ये निवड
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 12:08 PM

मुंबई | क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या निमित्ताने टीम इंडियात स्टार खेळाडूचं जवळपास 1 वर्ष 3 महिन्यांनंतर कमबॅक झालं आहे. बीसीसीआयने अजिंक्य रहाणे याच्या कामगिरीची दखल घेत अखेर त्याला संधी दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अंजिंक्य रहाणे याने अखेरचा कसोटी सामना हा 2022 जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो टीममधून बाहेर होता. काही वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या टीम इंडियाच्या 2 खंद्या कार्यकर्त्यांना निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. चेतेश्वर पुजारा याने काही महिन्यांनी संघात स्थान मिळवलं. मात्र अजिंक्य रहाणे बाहेरच होता. त्याला इथवर पुन्हा पोहचण्यासाठी भरपूर संघर्ष आणि प्रतिक्षा करावी लागली. या दरम्यानच्या काळात त्याने आपली छाप सोडली. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 16 व्या मोसमातही त्याने आतापर्यंत धमाका केलाय. त्यामुळे आता रहाणे या एकमेव पण महत्वाच्या महामुकाबल्यात कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

महामुकाबला केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

भारतीय संघ जाहीर

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.