AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC FINAL 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कधी, कुठे आणि केव्हा? एका क्लिकवर जाणून घ्या

130 कोटी भारतीयांचे ते स्वप्न रोहित शर्मा करणार पूर्ण?, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल कधी, कुठे आणि केव्हा? होणार आहे. याबाबत सर्व काही माहिती एका क्लिकवर!

WTC FINAL 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कधी, कुठे आणि केव्हा? एका क्लिकवर जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 13, 2023 | 6:36 PM
Share

WTC Final 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिप फेरीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. कसोटी क्रिकेटमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये झाली होती. त्यावेळी किवींनी भारतीय संघावर विजय मिळवत नाव कोरलं होतं. यंदा भारताने परत एकदा अंतिम फेरी गाठली. तुम्हाला माहिती आहे का अंतिम सामना केव्हा, कुठे आणि केव्हा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कोठे होणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या मोसमाचा अंतिम सामनाही इंग्लंडमध्ये होणार आहे. आयसीसीने यासाठी लंडनच्या केनिंग्टन ओव्हलची निवड केली आहे. आयसीसीला लॉर्ड्सवर त्याचे आयोजन करायचं  असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेतेपद सामना कधी खेळला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाईल. त्याचवेळी, आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. कारण त्यावेळी इंग्लंडमधील पावसाने हजेरी लावू शकतो म्हणून हा दिवस राखीव ठेवला आहे.

Ind vs Aus WTC फायनल किती वाजता सुरू होईल?

WTC फायनल सुरू होण्याची वेळ काय असेल? स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होईल, परंतु त्यावेळी भारतामध्ये दुपारी 3.30 वाजता असेल. दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे.

तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी 2023 फायनल थेट पाहू शकता, तर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी हॉटस्टारवर लॉग इन करावे लागेल. कारण ICC इव्हेंटचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?