श्रीलंका कसोटी दौऱ्यावर यशस्वी जयस्वालने काढली रोहित शर्माची आठवण, मजेशीर पोस्ट केली शेअर

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. असं असताना डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालने रोहित शर्माची आठवण काढली. मैदानात फिल्डिंग करताना त्याला रोहितने खडे बोल सुनावले होते.

श्रीलंका कसोटी दौऱ्यावर यशस्वी जयस्वालने काढली रोहित शर्माची आठवण, मजेशीर पोस्ट केली शेअर
श्रीलंका कसोटी दौऱ्यावर यशस्वी जयस्वालने काढली रोहित शर्माची आठवण, मजेशीर पोस्ट केली शेअर
Image Credit source: BCCI
| Updated on: Aug 07, 2026 | 7:00 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम सामन्यात कोणते दोन संघ पोहोचणार? यासाठी जोरदार चुरस आहे. ऑस्ट्रेलियाचं नाव आघाडीवर आहे, तर दुसऱ्या संघासाठी चढाओढ आहे. अशा स्थितीत भारतासाठी श्रीलंका दौरा खूपच महत्त्वाचा आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाने झेल पकडण्याचा जोरदार सराव केला. कारण मागच्या तीन महिन्यात भारतीय खेळाडूंना झेल सोडण्याची लागण लागली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या भूमीत उतरताच प्रशिक्षक गौतम गंभीरने झेल पकडण्याची शाळा घेतली. असं असताना सराव सामन्यात केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांनी झेल सोडले. त्यामुळे अजून कसून सराव करण्याची गरज आहे. या दरम्यान, डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालची पोस्ट चर्चेत आहे. कारण रोहित शर्माने त्याला क्षेत्ररक्षणावेळी फटकारलं होतं.

‘जिथपर्यंत खेळणार नाही तोपर्यंत उठायचं नाही’

यशस्वी जयस्वालने मागच्या काही सामन्यात झेल सोडले आहेत. त्यामुळे श्रीलंकेत पोहोचल्यानंतर त्याचा पहिला फोकस हा क्षेत्ररक्षणाकडे होतो. या सरावादरम्यानचा काही फोटो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. इतकंच काय तर त्या फोटोला मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. ‘क्योंकि एक लीजेंड ने कहा था, जब तक खेलेगा नहीं, तब तक उठने का नहीं.’, अशी कॅप्शन त्याने दिली आहे. बॉर्डर गावस्कर ट्ऱॉफी 2024-2025 मध्ये स्टीव्ह स्मिथ स्ट्राइकला असताना जयस्वाल सिली पॉइंटला हेल्मेट घालून फिल्डिंग करत होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना खेळाडूला झेल पकडण्यासठी पुढे झुकावं लागतं. पण स्मिथ शॉट खेळण्यापूर्वी जयस्वाल उठून पोझिशन घेत होता. तेव्हा रोहितने त्याला सुनावलं होतं.

स्लिपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने रागाच्या भरात जयस्वालला सांगितलं होतं की, “ऐ जस्सू, गली क्रिकेट खेल रहा है क्या? नीचे बैठ के रह.” रोहित शर्माचं हे वाक्य स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झालं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. आताही श्रीलंकेत यशस्वी जयस्वाल हेल्मेट घालून क्षेत्ररक्षणाचा सराव करत होता. फोटो आणि कॅप्शनमधून यशस्वी जयस्वालने रोहितचं म्हणणं ऐकल्याचं सांगितलं. इतकंच झेल पकडण्यासाठी यशस्वी गुडघ्यात वाकून, हाताचे पंजे जमिनीच्या जवळ ठेवून सज्ज होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us