IND vs AFG | ‘यशस्वी’ सुरुवात, जयस्वालचं अफगाणिस्तान विरुद्ध तडाखेदार अर्धशतक

Yashasvi Jaiswal Fifty | टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबईकर असलेला रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. मात्र दुसरा मुंबईकर यशस्वी जयस्वाल पेटून उठला आणि अफगाणिस्तान विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलंय.

IND vs AFG | यशस्वी सुरुवात, जयस्वालचं अफगाणिस्तान विरुद्ध तडाखेदार अर्धशतक
| Updated on: Jan 14, 2024 | 9:50 PM

इंदूर | टीम इंडियाचा युवा सलामीवीर मुंबईकर यशस्वी जयस्वाल याने टी 20 मध्ये 2024 सालची सुरुवात ही झंझावाती अर्धशतकाने केली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात 173 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा या मालिकेत सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे टीम इंडिया काही अंशी बॅकफुटवर गेली. मात्र यशस्वीवर त्याचा काहीच फरक पडला नाही.

यशस्वीने एका बाजूने दे दणादण फटकेबाजी सुरु ठेवली. यशस्वीने या अर्धशतकादरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. यशस्वीने अवघ्या 27 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. यशस्वीच्या टी 20 कारकीर्दीतील हे चौथं अर्धशतक ठरलं. यशस्वीने हे अर्धशतक 4 चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने पूर्ण केलं. यशस्वीने 185.19 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं.

यशस्वीला पहिल्या टी 20 सामन्यात ऐनवेळेस दुखापत झाल्याने खेळता आलं नाही. त्यामुळे त्याच्या जागी शुबमन गिल याला संधी देण्यात आली. मात्र दुसऱ्या सामन्यासाठी यशस्वी उपलब्ध असल्याने यशस्वीला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. यशस्वीने या संधीचा पूर्ण फायदा घेत धमाकेदार अर्धशतक ठोकलं आहे.

यशस्वी जयस्वालं याचं अर्धशतक

यशस्वीने अर्धशतकानंतर दांडपट्टा असाच सुरु ठेवला. मात्र यशस्वीला अर्धशतकानंतर 18 धावाच जोडता आल्या. यशस्वी 68 धावांवर आऊट झाला. करीम जनात याने गुरबाजच्या हाती यशस्वीला कॅच आऊट केलं. यशस्वीने 6 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 68 धावा केल्या.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.