AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी जयस्वाल सापडला अडचणीत, आकाश चोप्राने केलं उघड! आता टी20 वर्ल्डकपमध्ये काय होणार?

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. तीन सामने अगदी हातातून निसटले. तसेच आतापर्यंत 8 सामन्यात विजय मिळवून 16 गुणांसह प्लेऑफमधलं स्थान पक्कं केलं आहे. पण असं सर्व असताना यशस्वी जयस्वालची अडचण अधोरेखित झाली आहे. आता आकाश चोप्राने थेट प्रश्न करत कोंडी केली आहे.

यशस्वी जयस्वाल सापडला अडचणीत, आकाश चोप्राने केलं उघड! आता टी20 वर्ल्डकपमध्ये काय होणार?
Image Credit source: PTI
| Updated on: May 08, 2024 | 7:26 PM
Share

यशस्वी जयस्वाल भारतीय क्रिकेट संघातील उभरता तारा आहे. अल्पावधीतच त्याने काही विक्रमांना गवसणी घातली आहे. डावखुऱ्या यशस्वी जयस्वालने क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. कसोटी, टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने दोन द्विशतकं ठोकली. त्यामुळे त्याच्या नावाचा उदो उदो झाला. पण आयपीएलमध्ये येताच यशस्वी जयस्वालची बॅट शांत झाली आहे. यशस्वी जयस्वालची बॅटिंग शैली पूर्णपणे फेल गेल्याचं दिसत आहे. वारंवार प्रयत्न करूनही हव्या तशा धावा येत नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. आता त्याची ही निराशाजनक कामगिरी पाहून माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने एक प्रश्न उपस्थित केला आहे. यशस्वीच्या एका चुकीचा त्याला फटका बसल्याचं त्याने अधोरेखित केलं आहे.

यशस्वी जयस्वाल आयपीएलमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाजाला विकेट देऊन बसला आहे. खासकरून आखुड टप्प्याच्या चेंडूवर विकेट गमावली आहे. आकाश चोप्राला त्याची ही उणीव दिसून आली आहे. त्याचा फटकी टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बसू शकतो. आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं की, “जेव्हा कधी धावांचा पाठलाग करण्याची पाळी येते, तेव्हा यशस्वी जयस्वाल लेफ्ट आर्म पेसर्सला विकेट देऊन बसतो. तो आखुड टप्प्याच्या चेंडूवर पहिल्यांदाच आऊट झालेला नाही. अनेकदा तो बाउंसरवर विकेट देऊन बसला आहे.” आकाश चोप्राचं हे निरीक्षण अगदी बरोबर आहे.

यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात एक शतक ठोकलं आहे. त्याच्या खेळीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने त्याचं कौतुक केलं होतं. त्यानंतर त्याची निवडही टी20 वर्ल्डकप संघात झाली आहे. पण यशस्वी जयस्वाल सलग धावा करताना दिसत नाही. असंच राहिलं तर फॉर्म गमवण्यास वेळ लागणार नाही. अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याच्या अडचणीचा फायदा घेतला जाऊ शकतो. दुसरीकडे, ही चूक दुरुस्त करण्यास यशस्वी जयस्वालकडे जास्त वेळ नाही. आयपीएलमध्ये उर्वरित सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यात राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिळवलं आणि त्यात जयस्वालची भूमिका मोलाची ठरली तर तो टी20 वर्ल्डकपमध्ये प्लेइंग 11 चा भाग असेल.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.