Year Ender 2025 : कसोटी क्रिकेटमधील या वर्षातील 10 मोठे वाद, यामुळे क्रिकेटविश्वात उडाली खळबळ
Image Credit source: Robert Cianflone/Getty Images
वर्ष संपणार म्हंटलं तर त्या वर्षभरात काय केलं याचा लेखाजोखा तर मांडला जाणार, यात काही शंका नाही. प्रत्येक क्षेत्रात काही चांगल्या काही वाईट गोष्टी घडल्या. चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी बांधून आता नववर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. पण काही घडामोडी अशा घडल्या की त्याचा परिणाम मनावर खोलवर झाला आहे. अशाच काही घडामोडी क्रिकेटच्या मैदानात घडल्या. खासकरून कसोटी क्रिकेटमधील वाद चर्चेच विषय ठरले. आता हे विषय पुढील काही वर्षे क्रीडाप्रेमींच्या चर्चेत राहतील यात काही शंका नाही. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका ते एशेज कसोटी मालिकेदरम्यान बरंच काही घडलं आहे. चला जाणून घेऊयात या वर्षभरात कसोटीत कोणत्या वादाला फोडणी मिळाली ती…
- भारत इंग्लंड यांच्यात मॅनेचेस्टर कसोटीतील वाद कोणीच विसरू शकत नाही. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी हँडशेक न करण्यापूर्वी वादाला फोडणी मिळाली होती. हा सामना ड्रॉच्या दिशेने चालला होता. पण रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होतो. त्यामुळे ड्रेसिंग रूममधून नकार दिला गेला होता. रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सची सामना ड्रॉ करण्याची ऑफर नाकारली.
- मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कसोटीत बेन डकेटला बाद केल्यानंतर आक्रमकपणे आनंद साजरा केला होता. त्यामुळे आयसीसीने याची गंभीर दखल घेतली आणि आचारसंहिता कलम 2.5चं उल्लंघन केल्याप्रकरणी सिराजच्या सामना फीमधून 15टक्के दंड ठोठावला.
- इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव करत होता. तेव्हा भारतीय खेळाडूंना रोखलं गेलं. त्यानंतर गौतम गंभीर आणि क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला. क्यूरेटरने गंभीरला खेळपट्टीवर जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे गंभीर संताप व्यक्त करत खडे बोल सुनावले होते.
- ड्यूक्स बॉलच्या गुणवत्तेवरून बराच वाद रंगला. कारण भारत इंग्लंड कसोटी मालिकेत चेंडू वारंवार बदलावा लागत होता. लॉर्ड्स कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारताने आयसीसीकडे तक्रार केली होती. पंचांनी दिलेला चेंडू दहा षटकानंतर खराब झाला होता. चेंडू 30 ते 35 षटकं इतका जुना दिसत होता.
- अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी या नावावरून वाद झाला. कारण या मालिकेचं नाव आधी पतौडी ट्रॉफी होतं. ते बदलल्याने काही जणांनी आक्षेप घेतला. तर अँडरसन तेंडुलकर ऐवजी या मालिकेचं नाव तेंडुलकर अँडरसन ठेवावं असा वादही यावेळी निर्माण झाला.
- लॉर्ड्स कसोटीत आणखी वाद रंगला तो म्हणजे मैदानातील टाइमपास.. शेवटची काही षटकं शिल्लक असताना इंग्लंडचा झॅक क्राउली जाणीवपूर्वक वेळ वाया घालवत होता. यामुळे जसप्रीत बुमराह संतापला होता. इतकंच शुबमन गिल आणि क्राउली यांच्यात वादही झाला होता.
- भारत आणि दक्षिण अफ्रिका गुवाहाटी कसोटी सामन्यापूर्वी अशीच वादाला फोडणी मिळाली होती. तेव्हा दक्षिण अफ्रिकेचे कोच शुकरी कॉनराड याने भारताविरुद्ध रणनिती वापरण्यासाठी ग्रोवेल या शब्दाचा वापर केला होता. यानंतर अनिल कुंबळे आणि चेतेश्वर पुजारा यांनी या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतला होता.
- मेलबर्न कसोटीत जो रूटने मार्नस लाबुशेनचा एक झेल पकडला. या झेलवरून वादाला फोडणी मिळाली. कारण हा झेल जमिनीच्या संपर्कात आला होता. पण पंचांनी त्याला बाद दिला. लाबुशेन यानंतर भडकला आणि पंचांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.
- विराट कोहली आणि सॅम कोन्टास हा वाद कोणीच विसरू शकत नाही. कसोटी सामन्यात विराट कोहलीने सॅम कोन्टासला खांद्याने धक्का दिला होता. त्यानंतर मैदानात आणि मैदानाबाहेर बराच वाद झाला होता.
- एडलेड कसोटीतील डीआरएश आणि स्निकोमीटर यावरूनही वाद झाला. एशेज कसोटी मालिकेतील सामन्यात एलेक्स कॅरीने खेळलेल्या शॉट्सवर अल्ट्रा एज स्पाईक दिसले. पण चेंडू खेळण्याच्या आधीच दिसलं होतं. पण चेंडू बॅटजवळ असताना तसं काही दिसलं नाही. त्यामुळे त्याला नाबाद घोषित केलं. डीआरएसमधील तांत्रिक बिघाडामुळे वाद निर्माण झाला.