रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत युवराज सिंगने केलं मोठं वक्तव्य, स्पष्टच सांगितलं की…

| Updated on: Apr 26, 2024 | 9:58 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेसाठी निवड व्हायची आहे. तत्पूर्वी आयसीसीने मोठा निर्णय घेत युवराज सिंगला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा भाग बनवला आहे.

रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत युवराज सिंगने केलं मोठं वक्तव्य, स्पष्टच सांगितलं की...
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 36 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची आयसीसीने ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. युवराज सिंहसह ख्रिस गेल आणि उसैन बोल्ट यांनाही हा मान देण्यात आला आहे. यावेळी आयसीसीच्या कार्यक्रमात युवराज सिंगने अनेक प्रश्नांना उत्तरं दिल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीबाबत त्याने भाष्य केलं. युवराज सिंगने सांगितलं की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्वत:लाच निवृत्ती घेण्याचा अधिकार आहे. हा निर्णय आपल्याला त्यांच्यावरच सोडायला हवा.” युवराज सिंगने सांगितलं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आंतरराष्ट्रीय करिअरमधून टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर निवृत्ती घेण्यास हरकत नाही.

टी20 वर्ल्डकप संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली असणार आहेत यात शंका नाही. गेल्या वर्षभरापासून या दोघांनी टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. पण या दोघांनी जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या टी20 मालिकेतून पुनरागमन केलं. युवराज सिंगने सांगितलं की, “मी टी20 फॉर्मेटमध्ये युवा खेळाडूंना पाहू इच्छितो. अनुभवी खेळाडूंनी वनडे किंवा कसोटी सामने खेळावेत. त्यांच्यावरील भार हलका होईल. या टी20 वर्ल्डकपनंतर मी संघात युवा खेळाडूंना पाहू इच्छितो. पुढच्या वर्ल्डकपसठी संघ बनताना पाहू इच्छितो.”

टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. भारतीय संघाने कॅरिबियन बेटावर सर्वच प्रकारचं क्रिकेट खेळं आहे. त्यामुळे संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजमधल्या खेळपट्ट्या संथ आहेत. या खेळपट्ट्यांवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होईल. टीम इंडिया अमेरिकेत वेगवेगळ्या स्थानी साखळी फेरीतील सामने खेळणार आहे. सुपर 8 फेरीतील सामने वेस्ट इंडिजमध्ये होतील.

भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने

  • भारत विरुद्ध आयर्लंड, 5 जून, न्यूयॉर्क
  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 9 जून, न्यूयॉर्क
  • भारत विरुद्ध अमेरिका, 12 जून, न्यूयॉर्क
  • भारत विरुद्ध कॅनडा, 15 जून, फ्लोरिडा