Test Cricket : सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स, बुमराहनंतर या गोलंदाजाचा कारनामा, कोण आहे तो?

Test Cricket : भारताचा वेगवान आणि मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह याने इंग्लंड दौऱ्यात सलग 2 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. आता त्यानंतर एका गोलंदाजाने बुमराहसारखाच कारनामा केला आहे.

Test Cricket : सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स, बुमराहनंतर या गोलंदाजाचा कारनामा, कोण आहे तो?
Team India Bowler Jasprit Bumrah
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2025 | 12:45 AM

टीम इंडियाने अवघ्या काही दिवसांपूर्वी यजमान इंग्लंडवर पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताने यासह इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्कलोडमुळे या मालिकेतील फक्त 3 सामन्यांमध्येच खेळला. बुमराह या मालिकेत भारताला एकही सामन्यात विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने प्रतिस्पर्ध्यांना रोखून ठेवलं. बुमराहने सलग 2 सामन्यांमध्ये 5-5 विकेट्स घेतल्या. आता बुमराहनंतर आणखी एका गोलंदाजाने अशीच कामगिरी केलीय. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हॅनरी याने झिंब्बावे विरुद्ध एकाच मालिकेत सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केलीय.

मॅटने बुलावायोत आयोजित दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी 7 ऑगस्टला हा कारनामा केला. झिंबाब्वेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. झिंबाब्वेला पहिल्या डावात 150 पारही पोहचता आलं नाही. मॅटने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने झिंबाब्वेला 48.5 ओव्हरमध्ये 125 रन्सवर ऑलआऊट केलं.

मॅटने पहिल्या डावात एकूण 15 ओव्हर बॉलिंग केली. मॅटने या दरम्यान 2.70 च्या इकॉनॉमी रेटने 40 धावा देत झिंबाब्वेच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर झॅकरी फॉल्क्स याने 4 विकेट्स घेत मॅटला चांगली साथ दिली. मॅट आणि झॅकरी या दोघांनीच झिंबाब्वेला झटपट गुंडाळलं. विशेष म्हणजे झॅकरीने पदार्पणात ही कामगिरी केली.

सलग दुसऱ्यांदा ‘पंजा’

मॅटची कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही सहावी वेळ ठरली. तसेच मॅटने या मालिकेत सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी करुन दाखवली. मॅटने बुलावायोत आयोजित पहिल्या कसोटी सामन्यातही 5 विकेट्स मिळवल्या होत्या. मॅटने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 3 असे एकूण 9 विकेट्स घेतल्या. मॅटने अशाप्रकारे या मालिकेतील 3 डावात आतापर्यंत एकूण 14 विकेट्स घेतल्या आहेत.

मॅटचा सलग दुसऱ्या सामन्यातही पंजा

न्यूझीलंड 49 धावांनी आघाडीवर

दरम्यान न्यूझीलंडने झिंबाब्वेला झटपट गुंडाळल्यानंतर पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 49 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने 39 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत. विल यंग 74 धावांवर बाद झाला. तर डेव्हॉन कॉनव्हे 79 आणि जेकब डफी 8 धावांवर नाबाद आहेत.