AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक संधी मिळालीय, ‘या’ क्रिकेटपटूमुळे भविष्यात हार्दिक पांड्याच होऊ शकतं मोठ नुकसान

तिन्ही दिग्गजांनी T20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टीममध्ये ओपनर, नंबर 3 आणि लेफ्ट आर्म ऑलराऊंडरची जागा रिकामी झाली आहे. भविष्यात एक नवीन टीम इंडिया पहायला मिळणार आहे. टीममधील एका क्रिकेटपटूमुळे भविष्यात हार्दिक पांड्याच मोठ नुकसान होऊ शकतं.

एक संधी मिळालीय, 'या' क्रिकेटपटूमुळे भविष्यात हार्दिक पांड्याच होऊ शकतं मोठ नुकसान
मागचे दहा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. हे जे अश्रू आहेत, ते दु:खाचे नाहीत. हे आनंदाश्रू आहेत. टीम इंडिया तुमचे खूप-खूप आभार असं हा क्रिकेटपटू म्हणाला.
| Updated on: Jul 06, 2024 | 1:34 PM
Share

बार्बाडोसमध्ये मागच्या शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने 13 वर्षापासूनच ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फायनल जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तिन्ही दिग्गजांनी T20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टीममध्ये ओपनर, नंबर 3 आणि लेफ्ट आर्म ऑलराऊंडरची जागा रिकामी झाली आहे. भविष्यात एक नवीन टीम इंडिया पहायला मिळणार आहे. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. बीसीसीआय या टूरवर तीन पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. यात T20 कॅप्टनशिपवर फोकस असेल.

शुभमन गिलने आधीच आपली फलंदाजीची क्षमता सिद्ध केली आहे. T20 आणि वनडे फॉर्मेटमध्ये आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. भारतीय टीमचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. मागच्या काही काळापासून त्याची बॅट शांत आहे. त्यामुळे त्याला T20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळू शकलं नाही. आता पुन्हा एकदा त्याच्याकडे क्षमता दाखवण्याची संधी आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात शुभमन गिल पहिल्यांदा टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. फलंदाजीसोबत चांगली कॅप्टनशिप केली, तर तो T20 च्या पुढच्या कॅप्टनशिपसाठी दावेदार ठरु शकतो.

सर्व निकषांमध्ये एकदम फिट बसतो

पाच मॅचची ही सीरीज टीम इंडियाने सहज जिंकली, तर कॅप्टनशिपसाठी गिल सुद्धा दावेदार ठरेल. अशामध्ये हार्दिक पांड्याच नुकसान होऊ शकतं. पांड्या या शर्यतीत मागे पडेल, त्याला इंजरी सुद्धा एक कारण आहे. हार्दिक पांड्या अनेकदा त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर असतो. अशावेळी बीसीसीआय रोहित शर्माच्या जागी मजबूत पर्यायाच्या शोधात आहे. गिल फिटनेसपासून फलंदाजी सर्व निकषांमध्ये एकदम फिट बसतो. त्याशिवाय छोट्या वयात तो भारतीय क्रिकेटमधील मोठा चेहरा बनलाय.

आधी कुठे नेतृत्व केलय?

शुभमन गिल पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडल्यानंतर गिलने नेतृत्वाची धुरा संभाळली. कॅप्टनशिपच्या दृष्टीने आयपीएलचा हा सीजन त्याच्यासाठी खास ठरला नाही. गुजरात टायटन्सची टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकली नाही. याआधी अंडर-19 मध्ये तो टीम इंडियाचा उपकर्णधार होता. 2019 देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ब्लू चा कॅप्टन होता. देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया सी च नेतृत्व केलय.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?