
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. अचानक सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची घोषणा हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी केली. दोघेही मिळून मुलाचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले. आता नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा हार्दिक पांड्या हा प्रेमात पडलाय. नुकताच तो गर्लफ्रेंडसोबत विमानतळावर स्पॉट झाला तर त्याने थेट मालदीवमधील खास फोटोही शेअर केला. ज्यामध्ये हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा स्पष्ट दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा या सतत रंगताना दिसल्या. आता दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसतंय. हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तो काळा शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसतोय, तर माहिका शर्मा ही पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये त्याच्यासोबत उभी दिसत आहे. दोघांचाही लूक जबरदस्त दिसत आहे. मागच्या बाजूचा त्याने फोटो शेअर केलाय. मात्र, ही माहिका शर्माच आहे.
हा फोटो शेअर करण्याच्या काही तास अगोदर दोघे विमानतळावर एकत्र स्पॉट झाले, ज्याचे व्हिडीओ देखील पुढे आले. आज शनिवारी क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा वाढदिवस आहे. महिका शर्माने हार्दिक पांड्याचा खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी हे दोघे मालदीवला गेले असून चांगला वेळ एकमेकांसोबत घालवत आहेत.
माहिका शर्मा ही हार्दिक पांड्याचे क्रिकेट सामने बघण्यासाठी बऱ्याचदा स्टेडियममध्ये देखील पोहोचली होती. सतत दोघांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या. मात्र, यापूर्वी दोघांनीही आपले नाते लपून ठेवले होते. माहिका शर्मा ही मॉडेल असून तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नरेंद्र मोदी चित्रपटात तिने काम केले. तिचे शिक्षण दिल्ली येथे झाले असून सोशल मीडयावर चांगली फॅन फॉलोइंग तिची बघायला मिळते.