IND vs NZ : न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने अवघ्या 7 तासात विराट कोहलीचा सर्वात मोठा आनंद घेतला हिरावून
IND vs NZ : भारतात टीम इंडिया विरुद्ध डॅरेल मिचेलचा रेकॉर्ड खूप शानदार आहे. सलग चौथ्यांदा भारताविरुद्ध त्याने 50 प्लस धावा केल्या आहेत. मागच्या सामन्यातही तो 84 धावांची इनिंग खेळलेला. पण न्यूझीलंडचा पराभव झाला होता.

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियममध्ये भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात डॅरेल मिचेल न्यूझीलंडसाठी संकटमोचक बनला. न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचं टार्गेट मिळालं होतं. या रन चेजमध्ये डॅरेल मिचेल न्यूझीलंडकडून कमालीची इनिंग खेळला. त्याने 96 चेंडूत आपलं शतक झळकावलं. टीमला एक भक्कम स्थितीत आणून ठेवलं. करिअरमधील डॅरेल मिचेलचं हे 8 व शतक होतं. डॅरेल मिचेलला टीम इंडिया विरुद्ध खेळणं विशेष आवडतं. तो प्रत्येकवेळी भारताविरुद्ध भरपूर रन्स बनवतो. यावेळी सुद्धा असच काहीस पहायला मिळालं.
डॅरेल मिचेल ही इनिंग एक महत्वाच्या क्षणी खेळला. सीरीजमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी न्यूझीलंडसाठी कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं खूप गरजेच होतं. डॅरेल मिचेलने कमालीचं प्रदर्शन केलं. त्याने विराट कोहलीला मागे टाकलं. मॅचच्या आधी आयसीसीने फलंदाजांची ताजी रँकिंग प्रसिद्ध केली होती. यात विराट कोहली 785 रेटिंग पॉइंटसह नंबर 1 वर होता. डॅरेल मिचेल 784 पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांमध्ये फक्त 1 अंकांचं अंतर आहे.
विराटकडे अजूनही संधी
राजकोट वनडेमध्ये विराट कोहलीने फक्त 23 धावा केल्या. विराट लवकर बाद झाल्याने मिचेलला संधी मिळाली. शतकी खेळीमुळे डॅरेल मिचेल विराटच्या पुढे निघून गेला. मिचेल आयसीसी रँकिंगमध्ये आता दुसऱ्या नंबरवर दिसतोय. आता रॅकिंग पुढच्या आठवड्यात अपडेट होईल. पण तसा तो नंबर 1 फलंदाज आहे. रँकिंगची पुढील अपडेट बुधवारी होईल. विराटकडे तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा नंबर 1 स्थान मिळवण्याची संधी मिळेल.
टीम इंडियाला नेहमीच धोपटतो
भारतात टीम इंडिया विरुद्ध डॅरेल मिचेलचा रेकॉर्ड खूप शानदार आहे. सलग चौथ्यांदा भारताविरुद्ध त्याने 50 प्लस धावा केल्या आहेत. मागच्या सामन्यातही तो 84 धावांची इनिंग खेळलेला. पण न्यूझीलंडचा पराभव झाला होता. त्याआधी 134 धावा आणि 130 रन्सची इनिंग खेळलेला. मागच्या चार सामन्यात मिचेलने भारताविरुद्ध 3 शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंडने काल दुसरा वनडे सामना जिंकला. सध्या दोन्ही टीम मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहेत. आत तिसरी वनडे दोन्ही टीमसाठी करो या मरो आहे.