Team India : टीम इंडियाला मोठा धक्का, वनडेनंतर T20 सीरीज मधूनही स्टार खेळाडू बाहेर
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला काल पराभवाचा धक्का बसला आहे. त्यातच आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने संघातील एका स्टार खेळाडूला आता टी 20 मालिकेतून देखील बाहेर पडावे लागणार आहे.

टीम इंडिया सध्या न्युझीलंडविरोधात 3 वनडे मॅचेसची सीरिज खेळत असून त्यात दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकत मालिकेत बरोबर साधली आहे. मात्र याच सीरिजदरम्यान दुखापतीमुळे 2 खेळाडूंना टीम इंडियाच्या (Team India) बाहेर पडावे लागले. मात्र आता टीम इंडियाचं टेन्शन आणखी वाढताना दिसणार आहे. कारण वनडे नंतर एक खेळाडू आता न्युझीलंडविरुद्धच्या टी-20 स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या आधी हाँ भारतीय संघासाठी मोठा झटका मानला जाता आहे.
T20 सीरीजमधून या खेळाडूचा पत्ता कट
भारतीय क्रिकेट संघासाठी वाईट बातमी आली आहे की, स्टार ऑलराउंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आता सध्या चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेतून तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर पडला आहे. वॉशिंग्टन सुंदर याला यापूर्वी वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात साइड स्ट्रेनचा त्रास झाला होता. त्यामुळे त्या सामन्यात, तो फक्त 5 ओव्हर्स टाकू शकला. एवढंच नव्हे तर फलंदाजी करतानाही त्याला वेदना जाणवत होत्या. त्याला एकदिवसीय मालिकेतून वगळल्याची पुष्टी बीसीसीआयने सोमवारी (12 जानेवारी) केली. आता, याच संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे त्याची दुखापत गंभीर असून येत्या 21 जानेवारीपासून जानेवारीपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेतही वॉशिंग्टन सुंदर हा सहभागी होऊ शकणार नाही.
मात्र त्याची ही दुखापत एवढीच नर्यादित नसून पुढील महिन्यात आगामी टी-20 वर्लडकपासाठी देखील टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. कारण वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग आहे आणि त्याची उपयुक्तता संघाच्या बॅलेन्ससाठी अतिशय महत्त्वाची आहे. तो त्याच्या ऑफ-स्पिन आणि शक्तिशाली फलंदाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना सुदंर याला ही दुखापत झाली. त्या सामन्यात त्याला न्यूझीलंडच्या डावात 27 धावा देऊन एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि नितीश कुमार रेड्डी याला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आले. तर नंतर फलंदाजीस आल्यावरही तो फक्त 7 धावा (नाबाद) करू शकला, पण धाव घेताना तो खूपच अस्वस्थ दिसत होता. सुंदरच्या स्नायूंवर ताण पडला आहे आणि स्कॅननंतर याबद्दल अपडेट मिळतली असं कॅप्टन शुभमन गिलने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं होतं. मात्र आता तो उर्वरित सामने आणि टी-20 सीरिजलाही मुकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारताच्या 3 खेळांडूना दुखापत
टीम इंडिया आधीच दुखापतींशी झुंजत आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला साइड स्ट्रेनमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागले, तर तिलक वर्मा याच्यावर मांडीच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो पहिल्या तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडला होता. आता वॉशिंग्टन सुंदर यालाही दुखापत झाली असून तो संघाबाहेर पडला असून टीम इंडियाची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे.