David Warner IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी खेळीमुळे दिल्लीचा एकहाती विजय, जाणून घ्या सनरायझर्स हैदराबाद सोडण्याचं कारण

| Updated on: May 06, 2022 | 2:15 PM

डेव्हिड वॉर्नर मागीलवर्षी हैदराबादच्या संघातून खेळत होता. त्यावेळी काहीतरी वाद झाल्याने वॉर्नर सनरायजर्स हैदराबाद संघ सोडण्याचा निर्णय घेतला. कालच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने त्याच्या जुन्या संघाविरूद्ध जलद गतीने धावा केल्या.

David Warner IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी खेळीमुळे दिल्लीचा एकहाती विजय, जाणून घ्या सनरायझर्स हैदराबाद सोडण्याचं कारण
डेव्हिड वॉर्नरच्या तुफानीखेळीमुळे दिल्लीचा एकहाती विजय
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – यंदाचं आयपीएल (IPL 2022) अनेक खेळाडूंसाठी एकदम खास आहे. कारण त्यांच्या टीम बदलल्या आहेत. त्यामुळे ते खेळाडू आता तुफान खेळ करीत असल्याचं सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यापैकी एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज डावखुऱा फलंदाज डेव्हीड वॉर्नर (David Warner) हा आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने आत्तापर्यंत चांगली खेळी केली आहे. यावर्षी तो दिल्लीच्या (Delhi) संघाकडून खेळत आहे. काल झालेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अगदी जलद गतीने धावा केल्या. त्याने 58 चेंडूत 92 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीच्या संघाला आरामात विजय मिळविला आहे.

वाद झाल्याने सनरायजर्स हैदराबाद संघ सोडण्याचा निर्णय घेतला

डेव्हिड वॉर्नर मागीलवर्षी हैदराबादच्या संघातून खेळत होता. त्यावेळी काहीतरी वाद झाल्याने वॉर्नर सनरायजर्स हैदराबाद संघ सोडण्याचा निर्णय घेतला. कालच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने त्याच्या जुन्या संघाविरूद्ध जलद गतीने धावा केल्या. त्यावेळी तो एकदम खूश वाटतं होता. त्यावेळी प्रतिक्रिया देताना ते वॉर्नर म्हणाला की, अशावेळी मला सामन्यातून एक्ट्रा मोटिवेशन मिळतं.

माझी फलंदाजी चांगली होईल असा मला अंदाज होता

काल सामना झालेलं मैदान एकदम चांगलं होतं. मला माहित होतं की या मैदानावरती माझं फलंदाजी चांगली होईल. त्यामुळे माझं सगळं तिथं ठिक झालं. मुंबईच्या मैदानात मला फलंदाजी करीत असताना अधिक त्रास होतो. मुंबईचं मैदान अधिक गरम असल्याने तिथं खेळताना अधिक समस्येला तोंड द्यावे लागते. दुसऱ्या बाजूने रोमेन पॉवेल याने सुध्दा एकदम सुंदर साथ दिली. त्याचा खेळ पाहताना मला खूप आनंद होतो असं डेव्हिड वॉर्नरने सांगितलं. मागच्यावर्षी डेव्हिड वॉर्नरकडून चांगला खेळ झाला नव्हता. त्यामुळे हैदराबाद संघ व्यवस्थापकांकडून त्याला विचारणा केली होती. त्यामुळे त्यांने संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटलने 6.25 करोड रूपयांची बोली लावून खरेदी केलं.