Uttarakhand Cricket Association : युवा क्रिकेट खेळाडूला जीवे मारण्याची धमकी, उत्तराखंड क्रिकेटमधील नवा गोंधळ उजेडात

| Updated on: Jul 14, 2022 | 9:37 AM

एकोणीस वर्षाच्या क्रिकेटपटूला धमकी आल्यानंतर त्याच्या वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. दिलेल्या तक्रारीमध्ये उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव माहीम वर्मा, संघाचे मुख्य प्रशिक्षक मनीष झा तसेच संघटनेचे प्रवक्ते संजय गुसैन यांची नावे आहेत.

Uttarakhand Cricket Association : युवा क्रिकेट खेळाडूला जीवे मारण्याची धमकी, उत्तराखंड क्रिकेटमधील नवा गोंधळ उजेडात
युवा क्रिकेट खेळाडूला जीवे मारण्याची धमकी
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – खेळाडूंच्या (Cricket Player) आयुष्यातील समस्या पुन्हा एकदा नव्याने उघडकीस आल्या आहेत. कारर्कीदीच्या सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी खेळाडूंना सहन कराव्या लागतात. त्यामुळे अशा समस्या नेहमी उघडकीस येतात. परंतु जीवे मारण्याची धमकी खेळाडूंना आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केळीचं बील 35 लाख रुपये, दैनंदिन खर्च 49 लाख 58 हजार रुपये, पाण्याच्या बाटल्यांसाठी 22 लाख रुपये आणि कोरोनाच्या काळात 11 लाख रुपये खर्च झाले असं एकूण सगळं मिळून बील साधारण 1 कोटी 74 लाख रुपये आहे. उत्तराखंड क्रिकेटचे खेळाडू (Uttarakhand Cricket Player)त्यामुळे अधिक परेशान झाले आहेत. इतक्या समस्या आहेत असं काही नाही. सिलेक्शनच्या नावाखाली तिथं पैशांचा सुद्धा बाजार तिथं चालतो. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणचे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन (Cricket Association of Uttarakhand) ज्यावर त्यांच्यावर सगळे आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिस आणि तपास यंत्रणा त्यांची कसून चौकशी करीत असल्याचे समजते.

वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठले

एकोणीस वर्षाच्या क्रिकेटपटूला धमकी आल्यानंतर त्याच्या वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. दिलेल्या तक्रारीमध्ये उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव माहीम वर्मा, संघाचे मुख्य प्रशिक्षक मनीष झा तसेच संघटनेचे प्रवक्ते संजय गुसैन यांची नावे आहेत. पोलिसांनी वरीष्ठ पातळीवरती तिघांची चौकशी केली आहे. त्यामुळे याच्यातून अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन पोलिसांच्या रडारवर

डेहराडूनच्या एसएसपीने इंडियन एक्स्प्रेसला या प्रकरणातील सगळी माहिती दिली आहे. गेल्या तीन दिवसांत आम्ही माहीम वर्मा, मनीष झा आणि संजय गुसैन यांना स्वतंत्रपणे चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलविले आहे. त्यांनी दिलेली माहिती आम्ही नोंद करुन ठेवली आहे. तसेच त्यांची गरज वाटल्यास त्यांना तात्काळ चौकशीसाठी बोलवू असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. विजय हजारे दौऱ्याच्या दरम्यान जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती तक्रारीमध्ये दाखल करण्यात आली आहे. तसेच डेहराडूनमधील वसंत विहार पोलिस स्टेशनमध्ये उत्तराखंड क्रिकेटच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम 120, कलम 323, कलम 384, कलम 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताच्या 19 वर्षाखालील माजी क्रिकेटपटू आर्य सेठीचे वडील वीरेंद्र सेठी यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

हे सुद्धा वाचा