England Tour India 2021 | भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ग्रॅमी स्वानचा इंग्लंडच्या फिरकीपटूंना कानमंत्र

| Updated on: Jan 24, 2021 | 7:20 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

England Tour India 2021 | भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ग्रॅमी स्वानचा इंग्लंडच्या फिरकीपटूंना कानमंत्र
टीम इंडिया
Follow us on

लंडन : श्रीलंका दौरा (England Tour Sri Lanka) आटोपल्यानंतर इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर (India vs England) येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. या टेस्ट सीरिजसाठी इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वानने (Graeme Swann) आपल्या स्पिनर्सना कानमंत्र दिला आहे. “या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या फिरकीपटूंना फार संयम बाळगावा लागेल. तसेच जॅक लीच या दौऱ्यात निर्णायक भूमिका बजावेल”, असा अंदाज स्वानने व्यक्त केला आहे. (England spinners need to exercise restraint in Test series against Team India said former england spinner graeme swann)

“जॅक निर्णायक भूमिका बजावू शकतो”

जॅक लीच आणि डॉम बेस या फिरकी जोडीने श्रीलंकेविरोधात पहिल्या कसोटीत निर्णायक भूमिका बजावली. “जॅक इंग्लंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावू शकतो. जॅक या दौऱ्यात यशस्वी ठरु शकतो. जॅकने स्टंपच्या सरळ दिशेने गोलंदाजी करायला हवी. त्याने एका बाजूने सातत्याने अशी गोलंदाजी केल्यास आणि दुसऱ्या बाजूने मुख्य गोलंदाज मार्क वूड, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी भेदक मारा केल्यास भारतीय खेळाडूंवर आक्रमण करता येईल. यामुळे इतर फिरकीपटूंना टीम इंडियावर फिरकीने हल्ला चढवता येईल. परिणामी टीम इंडियावर दबाव निर्माण होईल, असंही स्वानने नमूद केलं. स्वान एका कार्यक्रमात बोलत होता.

स्वान इंग्लंडचा अनुभवी माजी फिरकीपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटीमध्ये भारतात 60 विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे भारतात यशस्वी होण्यासाठी नक्की काय करावं, हे त्याला चांगलंच ठावूक आहे.

“मी टाकलेला चेंडू स्पिन होणार याची मला खात्री असायची, तो चेंडू सपाट खेळपट्टीवरही स्पिन व्हायचा. तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर भारतीय फलंदाज तुमच्या विरोधात सम्मानाने खेळतात. सध्या टीम इंडियामध्ये वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) नाही. पण विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराट तो स्पिनरविरोधात खेळताना  गोलंदाज केव्हा खराब डिलीव्हरी टाकतो, याच प्रतिक्षेत असतो”, असं स्वानने म्हटलं.

“….तरच विकेट्स मिळणार”

भारतीय फलंदाज फार धैर्यशील आहेत. पण जर तुम्ही संयम बाळगलात आणि दिवसभर धैर्याने गोलंदाजी केली तर तुम्हाला विकेट्स मिळतील. टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. तुमची लय थोडीशी बिघडू शकते. पण त्यात हैराण होण्याचं कारण नाही”, असं स्वान आपल्या फिरकीपटूंना उद्देशून म्हणाला. दरम्यान पहिल्या 2 कसोटींसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. हे पहिले 2 सामने चेन्नईमध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहेत.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(England spinners need to exercise restraint in Test series against Team India said former england spinner graeme swann)