FIFA WC 2022 : उपांत्य फेरीतील पराभव लागला जिव्हारी, ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार याला दुःख अनावर, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची करु शकतो घोषणा

| Updated on: Dec 11, 2022 | 7:45 PM

FIFA WC 2022 : फीफा विश्वकपमध्ये अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लागला..

FIFA WC 2022 : उपांत्य फेरीतील पराभव लागला जिव्हारी, ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार याला दुःख अनावर, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची करु शकतो घोषणा
नेमार निवृत्ती घेणार?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : फीफा विश्वकप (FIFA World Cup 2022) मध्ये ब्राझीलच्या (Brazil) स्वप्नांना सुरुंग लागला आहे. ब्राझीलचे आव्हान उपांत्य सामान्यातच संपुष्टात आले. क्रोएशियाच्या विरोधातील पेनल्टी शूटआऊटमध्ये नेमार (Neymar) आणि त्यांच्या कंपनीला पराभव पत्कारावा लागला. हा पराभव नेमारच्या चांगलाच जिव्हारी लागला. स्वप्नाला सुरुंग लागल्याने त्याच्या डोळ्यातील आश्रू थांबण्याचे नावच घेत नाही. नेमार या पराभवाने एक मोठा निर्णय घेणार आहे. तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला (International Football) कायमचा रामराम ठोकू शकतो.

‘खरं सांगू, मला काहीच माहिती नाही. निवृत्तीविषयी आताच काही बोलणे योग्य होणार नाही. सध्या वातावरण कठिण आहे. कदाचित थेट विचार करत नाही. पण हे सगळंच संपणार, असं म्हणणे घाईचे ठरेल. पण कोणत्याही गोष्टीची हमी देऊ शकत नाही.’ असे नेमारने स्पष्ट केले.

‘बघुयात पुढे काय होईल. भविष्यात काय चांगलं होईल याविषयी मी आशावादी आहे. ब्राझीलसाठी खेळण्याचा दरवाजा मी बंद करणार नाही. पण मी याची खात्री देऊ शकत नाही.’ नेमारने त्याचे पत्ते अजूनही उलगडलेले नाहीत. पण तो निर्णय घेऊ शकतो, असा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

क्रोएशियाच्या विरोधात निश्चित कालावधीपर्यंत कोणतीही टीम कामगिरी बजावू शकली नाही. गोल करु शकली नाही. परंतु, 30 मिनिटाच्या अतिरिक्त वेळेत नेमारने आघाडी घेतली आणि ब्राझीलसाठी गोल केला. ब्राझीलने सामन्यात आघाडी घेतली.

पण हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. क्रोएशियाने गोल करुन सामना बरोबरीत आणला. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटकडे झुकला. एका गोलमुळे नेमारने एक विक्रम त्याच्या नावावर नोंदवला. तो पेलेसारखाच ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करणारणारा खेळाडू झाला.

या दोन्ही महान खेळाडुंनी ब्राझीलसाठी 77-77 गोल केले. या दोघांच्या नावावर हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. पण नेमारसाठी मोठी संधी आहे. नेमारने जर निवृत्तीचा विचार टाळला तर तो सर्वाधिक गोल करणारा ब्राझीलचे भविष्य ठरु शकतो.