
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56 वी बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला. काही वस्तूंवरील जीएसटी काढण्यात आलाय तर काहींना कमी जीएसटीच्या रांगेत आणून बसवण्यात आले आहे. आता चैनीच्या गोष्टींवरील जीएसटी हा सरकारकडून वाढवण्यात आला. पनीर, पिझ्झा, खाकरा, भुजिया, पेस्ट, साबण, तेल स्वस्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 15 ऑगस्टच्या भाषणात थेट जीएसटी कमी होणार असल्याचे म्हटले. काल बैठकीमध्ये मोठे निर्णय घेतल्यात आल्याचे बघायला मिळाले.
आयपीएल सामन्यांबद्दल आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल सामने बघायला जाणाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. आयपीएल सामन्याच्या तिकिटावर मोठा जीएसटी लावण्यात आला आहे. पूर्वीही यावर जीएसटी होता. मात्र, आता त्या जीएसटीमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. देशात आयपीएल सामन्यावेळी पैशांची मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलची सामने बघणाऱ्यांना अधिक पैसे मोजावी लागणार आहेत.
3 सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयपीएल तिकिटांवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल सामन्याच्या तिकिटांवर 40 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय झालाय. अगोदर या तिकिटांवर 28 टक्के जीएसटी होता आणि तो 40 टक्के करण्यात आला. याचा अर्थ की, आयपीएल बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. उदाहरनार्थ समजा तुमच्या आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकिट हे 2000 रूपये आहे. त्या तिकिटावर आता 800 रूपये जीएसटी हा तुम्हाला भरावा लागले.
म्हणजे 2000 हजारांचे तिकिट आणि त्यावर 800 रूपये जीएसटी याप्रमाणे. म्हणजे 2000 च्या तिकिटासाठी तुम्हाला अधिकचा जीएसटी भरून ते तिकिट तुम्हाला 2800 मध्ये पडेल. याचा परिणाम आपल्याला थेट आयपीएल सामन्यांमध्ये बघायला मिळेल. हा निर्णय फक्त आयपीएल सामन्याच्या तिकिटांसाठीच घेण्यात आला आहे. इतर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय तिकिटांसाठी नाही. आता आयपीएल सामने बघायला जर तुम्हाला स्टेडियममध्ये जायचे असेल तर अधिकचे पैसे हे भरावे लागतील. लग्झरी गाड्यांवरीलही जीएसटी आता वाढवण्यात आलाय.