IPL 2021 : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग, सलग तीन मॅचमध्ये ‘असा’ कारनामा! चर्चेला उधाण…

आयपीएलच्या (IPL 2021) इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग घडलाय जो याआधी कधीच घडला नव्हता. मागील तीन मॅचमध्ये पहिल्या डावांत बॅटिंग करणाऱ्या टीमने एकसारखा स्कोअर केलाय. (For the first time in the history of the IPL Three Matches Same Runs IPL 2021)

IPL 2021 : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग, सलग तीन मॅचमध्ये 'असा' कारनामा! चर्चेला उधाण...
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलग तीन सामन्यांत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने सारखाच स्कोअर केला. तो होता 171 रन्स.....!
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 6:39 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग घडलाय जो याआधी कधीच घडला नव्हता. मागील तीन मॅचमध्ये पहिल्या डावांत बॅटिंग करणाऱ्या टीमने एकसारखा स्कोअर केलाय. आयपीएलच्या 14 व्या पर्वात हा अजब योगायोग पाहायला मिळाला आहे. आपण पाहूयात कोणकोणत्या मॅचमध्ये सेम स्कोअर पाहायला मिळाला…. (For the first time in the history of the IPL Three Matches Same Runs IPL 2021)

आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलग तीन सामन्यांत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने सारखाच स्कोअर केला. तो होता 171 रन्स…..! मंगळवारी (तारीख 27), बुधवारी (तारीख 28), गुरुवारी (तारीख 29) अशा सलग तीन मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बंगळुरु, हैदराबाद आणि राजस्थान या संघांनी 171 रन्स केले.

बंगळुरुच्या 171 धावा

मंगळवारी बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 171 रन्स केले. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने 170 धावा केल्या. या सामन्यात अखेरच्या चेंडूवर दिल्लीला पराभूत व्हावं लागलं. बंगळुरुच्या मोहम्मद सिराजने दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावा होऊ दिल्या नाहीत.. पीचवर आक्रमक फलंदाज रिषभ पंत आणि शिमरन हेटमायर असून देखील मोहम्मद सिराजने त्यांना फटकेबाजी करुन दिली नाही, हे आणखीच विशेष…!

हैदराबादच्या 171 धावा

बुधवारी चेन्नई विरुद्ध हैदराबाद ही मॅच पार पडली. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने 3 विकेट्स गमावून 171 रन्स केले. प्रत्युत्तरादाखल बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईने आरामात हे लक्ष्य पूर्ण केलं. 3 विकेट्स गमावून चेन्नईने हे लक्ष्य गाठलं.

राजस्थानच्या 171 धावा

गुरुवारी मुंबई आणि राजस्थान यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावार सामना खेळला गेला. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 3 विकेट्स गमावून आरामात या लक्ष्य गाठलं. सलामीवीर डिकॉकने शानदार अर्धशतक झळकावलं. त्याच्याच अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने आरामात सामना जिंकला.

(For the first time in the history of the IPL Three Matches Same Runs IPL 2021)

हे ही वाचा :

DC vs KKR IPL 2021 Match 25 Result | पृथ्वी शॉचा झंझावात, दिल्ली कॅपिट्लसची कोलकात्यावर 7 विकेट्सने मात

IPL 2021, Prithvi Shaw | पृथ्वी शॉचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या 6 चेंडूत फटकावले 6 चौकार

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिन तेंडुलकर मैदानात, ‘मिशन ऑक्सिजन इंडियाला’ मदत, ‘इतकी’ रक्कम दिली

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.