विराट आजच्या युगातील देव : ग्रॅमी स्वान

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण खेळीने क्रिकेटमधील अनेक नवे विश्वविक्रम केले. त्याची जागतिक पातळीवर प्रशंसाही झाली. आता तर इंग्लंडच्या एका दिग्गज क्रिकेटरने विराटला आजच्या युगातील देव म्हटले आहे.

विराट आजच्या युगातील देव : ग्रॅमी स्वान
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 8:52 AM

लंडन: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण खेळीने क्रिकेटमधील अनेक नवे विश्वविक्रम केले. त्याची जागतिक पातळीवर प्रशंसाही झाली. आता तर इंग्लंडच्या एका दिग्गज क्रिकेटरने विराटला आजच्या युगातील देव म्हटले आहे. माजी ऑफ स्पिनर ग्रॅमी स्वानने विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील प्रामाणिकपणाचे कौतुक करत हे प्रशंसोद्गार काढले.

स्वान म्हणाला, “खेळाडूच्या बॅटला चेंडू लागतो, तेव्हा त्या खेळाडूला चेंडू बॅटला लागल्याचे समजते. अशावेळी आऊट नाही असे म्हणणाऱ्या खेळाडूंचा मला खूप राग येतो. पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या सामन्यात चेंडूचा विराट कोहलीच्या बॅटला स्पर्श झाला नव्हता. तरीही विराट अंपायरचा निर्णय येण्याआधी क्रिजवरुन बाहेर गेला. यातून विराटची खिलाडूवृत्ती दिसते. म्हणूनच विराट माझ्यासाठी आधुनिक काळातील देव आहे.”

काय आहे प्रकरण?

विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये 16 जून रोजी सामना झाला. त्या सामन्यात विराट कोहली 77 धावांवर खेळत होता. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर 47 वे षटक टाकत होता. या षटकाचा चौथा चेंडू शॉर्टपिच (बाउंसर) होऊन विराट कोहलीच्या बॅटजवळून गेला. हा चेंडू थेट यष्टीरक्षक सरफराज अहमदच्या हातात गेला. त्यावेळी मोहम्मद आमिर आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी आऊट असल्याचे अपील केले. यावेळी कोहली अंपायरने काही निर्णय देण्याच्या आधीच क्रिजवरुन पॅव्हेलियनच्या दिशेने गेला.

यानंतर स्निकोमीटरवरुन संबंधित चेंडू विराटच्या बॅटला लागलाच नसल्याचे स्पष्ट झाले. ड्रेसिंग रुममध्ये विराट आणि टीम इंडियाचे खेळाडू देखील यावर चर्चा करताना पाहायला मिळाले. विराट कोहलीने देखील आपल्या या निर्णयावर पश्चाताप व्यक्त केला. मात्र, कोहलीचा हा स्वतःहून घेतलेला निर्णय अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.