MI vs SRH : हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरसोबत खूप चुकीचा वागला, मैदानावर असं केलं अपमानित

MI vs SRH : कॅप्टन म्हणून या सीजनमध्ये हार्दिक पंड्या सपशेल फेल ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मुंबई इंडियन्सने या सीजनमध्ये सहा सामने गमावलेत. त्यात त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतलेत. आता शार्दुल ठाकूरच्या बाबतीत हार्दिक पंड्याने असं वागायला नको होतं.

MI vs SRH : हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरसोबत खूप चुकीचा वागला, मैदानावर असं केलं अपमानित
shardul thakur-hardik pandya
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 30, 2026 | 1:42 PM

MI vs SRH : आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर सुरु झाल्यापासून प्रत्येक टीम या नियमाचा फायदा उचलत आहे. आयपीएलच्या चालू सीजनमध्ये या नियमाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे. काल सनयरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात हार्दिक पंड्याने इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा वापर केला. हार्दिकने पंड्याने शार्दुल ठाकूरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवलं. पण शार्दुल सोबत जे झालं, ते याआधी कुठल्याही इम्पॅक्ट प्लेयर सोबत झालेलं नाही. IPL मध्ये अशा प्रकारच्या वर्तनाचा सामना करणारा शार्दुल ठाकूर पहिला इम्पॅक्ट प्लेयर बनला आहे.

शार्दुल ठाकूर यांच्यासोबत असं मैदानावर काय झालं? सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवलं. पण ना त्याला बॅटिंग दिली, ना बॉलिंग. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याने त्याला फक्त नावाचा इम्पॅक्ट प्लेयरचा टॅग दिला. IPL च्या इतिहासात इम्पॅक्ट प्लेयरचा नियम आल्यापासून हे असं पहिल्यांदा झालं आहे, जेव्हा कॅप्टनने इम्पॅक्ट प्लेयरला ना बॅटिंग दिली, ना बॉलिंग दिली. म्हणजे काहीही न करता मॅचमध्ये खेळणार शार्दुल पहिला इम्पॅक्ट प्लेयर बनला आहे.

शार्दुलची कामगिरी इतकी खराब नाही

आयपीएल 2026 मध्ये शार्दुलची कामगिरी खूप खराब आहे, असं नाहीय. फलंदाजीची त्याला फार संधी मिळालेला नाही. पण 7 सामन्यात 2 इनिंगमध्ये 14 धावा केल्यात. गोलंदाजीत मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेण्यात तो दुसऱ्या स्थानावर आहे.

हार्दिकपेक्षा मैदानात शार्दुल सरस

शार्दुल ठाकूरने मुंबई इंडियन्ससाठी 7 सामन्यात 5 डावात 6 विकेट काढले आहेत. आकड्यांच्या दृष्टीने पहायचं झाल्यास शार्दुल समोर टीमचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या मागे आहेत. त्यांनी 7 सामन्यात 7 डावात गोलंदाजी करताना आतापर्यंत 4 विकेट काढलेत.

टॉप बॉलर्सची धुलाई झाली

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध हार्दिक पंड्याने 10.63 च्या इकॉनमीने धावा दिल्यात. बुमराहने 13.50 च्या इकॉनमीने रन्स दिलेत. टीमचा यशस्वी गोलंदाज अल्लाह गजनफरची SRH विरुद्ध इकॉनमी 12.75 होती. टॉप बॉलर्सची जिथे धुलाई झाली, तिथे हार्दिकने शार्दुल ठाकूरला गोलंदाजी का दिली नाही?.

Follow Us