
Hardik Pandya : आशिया कपनंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने 4.5 कोटी रुपयांची नवकोरी लँबॉर्गिनी कार खरेदी केली. त्याच कारमध्ये बसून तो नव्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसला. या दोघांच्या व्हिडीओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हार्दिकची ही नवी गर्लफ्रेंड आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्रिकेटरचे चाहते उत्सुक आहेत. हार्दिकची नवीन गर्लफ्रेंड दिल्लीची राहणारी असून ती कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. तिचं नाव अनेकांनी आधीच ऐकलं असेल, कारण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.
हार्दिकच्या या नव्या गर्लफ्रेंडचं नाव माहिका शर्मा आहे. ती मॉडेल असून इन्स्टाग्रामवर लोकप्रिय आहे. माहिकाने दिल्लीतच शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. हार्दिक आणि माहिका पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे या दोघांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिकची नवीन हेअरस्टाइलसुद्धा दिसून येत आहे. त्याचसोबत त्याच्या नव्या कारची झलक पहायला मिळतेय. याच कारमध्ये बसून हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड एअरपोर्टला पोहोचले.
हार्दिकची नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्माची एकूण संपत्ती जवळपास 3.2 कोटी रुपयांच्या घरात आहे. नताशा स्टँकोविकला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक ब्रिटिश गायिका जॅस्मिन वालियासोबत दिसला होता. या दोघांच्याही अफेअरच्या चर्चा होत्या. परंतु लगेचच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आता हार्दिक माहिकासोबत दिसून येत आहे.
आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येण्यामागची हार्दिकची ही काही पहिलीच वेळ नाही. हार्दिकने याआधी नताशा स्टँकोविकशी लग्न केलं होतं. या दोघांना अगस्त्य हा मुलगा आहे. त्याची लव्ह-स्टोरीसुद्धा एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. नताशासोबत त्याची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. हार्दिकने 1 जानेवारी 2020 रोजी एका क्रूझवर नताशाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी नताशा प्रेग्नंट होती. त्यानंतर जुलै 2020 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माच्या तीन वर्षांनंतर हार्दिक आणि नताशाने उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं. मात्र त्याच्या काही महिन्यांतच दोघांनी घटस्फोट जाहीर करत सर्वांना धक्का दिला.