IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिकच्या हातातील घड्याळाची किंमत किती ?

Champions Trophy IND vs PAK: दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्या हा मैदानावर उतरला तेव्हा त्याच्या मनगटावरूल घड्याळ पाहून लोकांचे डोळेच विस्फारले. 7 कोटी रुपयांचे जगातील सर्वात आलिशान ब्रँडचे घड्याळ घालून तो खेळायला आला होता.

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिकच्या हातातील घड्याळाची किंमत किती ?
हार्दिकच्या हातातील घड्याळी किंमत किती ?
Image Credit source: social
| Updated on: Feb 24, 2025 | 2:13 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारातने काल पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. त्या विजयाचा शिल्पकार म्हणून विराट कोहलीचे नाव सध्या गाजत आहे. पण त्याच्या नाबाद शतकी खेळीव्यतिरिक्त इतरही अनेक फॅक्टर्स आहेत, जे या विजयासाठी महत्वपूर्ण ठरले. आठ ओव्हर्समध्ये फक्त 31 धावा देऊन 2 महत्वाच्या विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या याचाही कालच्या सामन्यातील विजयात महत्वाचा वाटा आहे. बाबार आझमला आऊट करून त्याने भारतासाठी पहिल्या विकेटचे सेलिब्रेशन केले, तेव्हा अनेकांची नजर हार्दिकच्या मनगटावर बांधलेल्या एका अत्यंत महागड्या घड्याळाकडे गेली.

हार्दिकने घातलं होतं कोणतं घड्याळ ?

हार्दिक पंड्याची आलिशान जीवनशैली, सर्वांनाच परिचित आहे. महागडे, ब्रांडेड कपडे, बूट, आलिशान जीवनशैली, मोठमोठ्या कार्स आणि बिनधास्त आयुष्य जगणारा हार्दिक पंड्या याच्याकडे घड्याळांचही तगडं कलेक्शन आहे. मात्र यावेळी त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळताना जे घड्याळ घातलं होतं ते पाहून अनेकांचे डोळेच विस्फारले. यावेळी हार्दिकच्या मनगटावर रिचर्ड मिल RM27-02 CA FQ टूरबिलन राफेल नडाल स्केलेटन डायल ॲडिशनचं घड्याळ दिसलं. विशेष गोष्ट म्हणजे या कलेक्शनची केवळ 50 घड्याळं बनवण्यात आली होती. मूळत: हे घड्याळ टेनिस जगताचा स्टार राफेल नदाल याच्यासाठी तयार करण्यात आलं होतं.

घड्याळाची किंमत किती ?

रिचर्ड मिल आरएम 027 हे जगातील सर्वात हलक्या घड्याळांपैकी एक आहे. स्ट्रॅपसह त्या घड्याळाचं वजन हे 20 ग्रॅम पेक्षाही कमी असल्याचं बोललं जातं. मात्र विशेष बाब म्हणजे या घड्याळाची किंमत तब्बल सात कोटी रुपये इतकी आहे. आरएम 27-02 हे घड्याळ ग्रेड 5 टाइटेनियम पुल ने बनलेले असून सुमारे 70 तास त्याचे पॉवर रिझर्व्ह आहे. या घड्याळाचे क्वॉर्ट्ज टीपीटी केस हे एक शानदार फॅशन स्टेटमेंट आहे. यापूर्वीही हार्दिक पांड्याने सामन्यात खेळताना हे घड्याळ घातलं होतं.

 

भारताचा पाकिस्तानवर सहज विजय

कालच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत चांगली सुरुवात केली होती. पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी झाली, तेव्हा भारत विकेटच्या शोधात होता. पण रोहित शर्माचे एकही शस्त्र प्रभावी ठरले नाही. अशा स्थितीत हार्दिक पांड्याने डावाच्यानवव्या षटकात बाबर आझमला (26 चेंडूत 23 धावा) बाद करून संघात पुनरागमन केले. पाकिस्तानला 241 धावाच करता आल्या. भारताने पहिल्या 45 चेंडूत चार विकेट गमावून ही धावसंख्या गाठली. विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं.