Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने तडकाफडकी सोडलं टीम इंडियाचे कर्णधारपद, रक्ताचे पाणी केले पण…पोस्ट करत काय म्हणाली?

Haramanpreet Kaur News: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने गोल्ड जिंकले. आता जिच्या नेतृत्त्वात भारतीय महिला संघाने गोल्ड जिंकले तिने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने तडकाफडकी सोडलं टीम इंडियाचे कर्णधारपद, रक्ताचे पाणी केले पण...पोस्ट करत काय म्हणाली?
| Updated on: Oct 06, 2026 | 11:28 AM

Harmanpreet Kaur Post: भारतीय महिला संघाची दीर्घकाळ कर्णधार राहिलेल्या हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी तिची जागा कोण घेणार. मात्र, कर्णधारपदासाठी स्मृती मंधाना ही प्रमुख दावेदार आहे. हरमनप्रीत कौरने इन्स्टा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली.

आपल्या पोस्टमध्ये हरमनप्रीत कौरने लिहिले आहे, “आज, मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. यात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे क्षण आहेत जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मी या संघाला आणि भारतीय महिला क्रिकेटला सर्वस्व दिले आहे—माझे रक्त, घाम, माझा वेळ आणि प्रसंगी माझ्या खेळाचा व वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचाही काही भाग. असे क्षण आले जेव्हा मला माझी वैयक्तिक कामगिरी, माझी प्रगती आणि माझ्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण माझा विश्वास होता की संघ सर्वात महत्त्वाचा आहे.” हरमनप्रीत कौरने तडकाफडकी हा निर्णय का घेतला यामगाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Loading...

हरमनप्रीत कौरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कर्णधार म्हणून तिचा कार्यकाळ संपला आहे, पण प्रवास सुरूच आहे. मी सर्व काही पाहिले आहे. मी अत्यंत कठीण क्षण, मनस्ताप, टीका, शंका आणि असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा काहीच आमच्या मनासारखं घडत नव्हतं. आणि मी सर्वात गौरवशाली क्षणही अनुभवले आहेत—विजय, जल्लोष, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान. आज, मी जड अंतःकरणाने, पण शांत मनाने कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. कारण माझा खरोखर विश्वास आहे की माझा संघ योग्य मार्गावर आहे. एक असा संघ ज्यात प्रतिभा, चारित्र्य, आत्मविश्वास आहे आणि ज्याचे भविष्य पाहण्यासाठी व त्याचा एक भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे.”

“मला वाटते की मी माझे कर्तव्य बजावले आहे. मी या संघाला माझे सर्वस्व दिले. मी ही जबाबदारी अभिमानाने पेलली आणि भारतीय महिला क्रिकेटचे कर्णधारपद भूषवण्याचा मान मिळाल्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. जरी माझे कर्णधारपद आज संपत असले, तरी भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही संपणार नाही. मी प्रत्येक सहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन, बीसीसीआय, कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानते, ज्यांनी माझ्या चढ-उताराच्या काळात मला पाठिंबा दिला.” घाम…त्याग…अभिमान. मी माझं सर्वस्व दिलं. आता मी खेळावरील प्रेमापोटी पुन्हा खेळायला तयार आहे. माझं कर्णधारपद संपलं आहे, पण प्रवास सुरूच आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us