Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरनं तडकाफडकी कर्णधारपद सोडलं, काल बीसीसीआयच्या मीटिंगमध्ये असं काय घडलं?

Haramanpreet Kaur BCCI Meeting: हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतला. पण हे कालच ठरल्याचे समजत आहे कारण काल बीसीसीआयची रिव्ह्यू मीटिंग पार पडली.

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरनं तडकाफडकी कर्णधारपद सोडलं, काल बीसीसीआयच्या मीटिंगमध्ये असं काय घडलं?
| Updated on: Oct 06, 2026 | 1:03 PM

Harmanpreet Kaur News: भारतीय महिला संघाची दीर्घकाळापासूनची कर्णधार हरमनप्रीत कोरने आता तिचं कर्णधारपद सोडलं आहे. तब्बल १० वर्षांचा कर्णधारपदाचा कार्यकाळ तिने संपवला आहे. हा प्रवास संपवत असताना ती प्रचंड भावूक झाली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली. पण हरमनप्रीत कौरच्या तडकाफडकी या निर्णयामागे बीसीसीआयसोबतची मीटिंग असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची ५ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीला कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना, प्रशिक्षक अमोल मजूमदार आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया उपस्थित होते. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतल्याचे समोर आले होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ती अधिकृतपणे समोर आली नसली तरीही पण त्याचे पडसाद आज उमटल्याचे दिसत आहे.

Loading...

यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, त्यानंतर संघाने सलग दोन दमदार कामगिरी केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप जिंकला आणि त्यानंतर जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावले.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

हरमनप्रीत कौरने एक पोस्ट लिहित तिच्या या निर्णयाबद्दलची माहिती दिली आहे. ती म्हणाली की, “मी भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होत आहे. हा निर्णय सोपा नाहीये, हा निर्णय म्हणजो खूप वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि अनमोल क्षणांशी निगडीत आहे. मी या संघासाठी सर्वस्व दिले आहे. संघ नेहमीच माझ्यासाठी प्राधान्य राहिला आहे. माझे रक्त, घाम, माझा वेळ आणि प्रसंगी, माझ्या खेळाचा आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचाही काही भाग दिला आहे. असे क्षण आले जेव्हा मला माझी वैयक्तिक कामगिरी, माझी प्रगती आणि माझ्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण माझा विश्वास होता की संघ सर्वात महत्त्वाचा आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us