शमीचे जगभरात कौतुक, पण बायको म्हणते एका मुलीचा बाप असूनही लाज वाटत नाही!

| Updated on: Jun 28, 2019 | 9:44 AM

विश्वचषक मालिकेत सलग दोन सामन्यात 4 बळी घेतलेल्या मोहम्मद शमीचं सध्या जगभर कौतुक केलं जात आहे. त्याच्या या कामगिरीमुळे जगभरात त्याचे कौतुक होत असले, तरी त्याची बायको हसीन जहा ने पुन्हा एकदा शमीवर ताशेरे ओढले आहेत.

शमीचे जगभरात कौतुक, पण बायको म्हणते एका मुलीचा बाप असूनही लाज वाटत नाही!
Follow us on

लंडन : विश्वचषक मालिकेत सलग दोन सामन्यात 4 बळी घेतलेल्या मोहम्मद शमीचं सध्या जगभर कौतुक केलं जात आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला चार विकेटची हॅट्रट्रिक घेऊन मोहम्मद शमीने विजय मिळवून दिला होता. तर काल (27 जून) वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातही 4 विकेट घेत मोहम्मद शमीने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्याच्या या कामगिरीमुळे जगभरात त्याचे कौतुक होत असले, तरी त्याची बायको हसीन जहा ने पुन्हा एकदा शमीवर ताशेरे ओढले आहेत.

मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या नाकीनऊ आणणाऱ्या शमीला मात्र वैयक्तिक आयुष्यात पत्नी हसीन जहाशी झगडावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी हसनीने शमी व त्याचे कुटुंबीय मला हुंड्यासाठी मारहाण करतात असा आरोप केला होता. यानंतर आता हसनीने शमीच्या टिक टॉकवरुन त्याच्यावर निशाणा साधला आहे.

मोहम्मद शमी त्याच्या टीक टॉक अकाऊंटवरुन केवळ 97 जणांना फॉलो करतो. त्यातील 90 टीक टॉक अकाऊंट हे फक्त मुलींचे असल्याचा हसीन जहाने म्हटलं आहे. त्याशिवाय याबाबतचा स्क्रिनशॉटही तिने तिच्या फेसबुकवर शेअर केला आहे.

बदमाश शमी अहमदने टिक टॉक अकाऊंट उघडले आहे. ज्यात त्याने 97 लोकांना फॉलो केले असून त्यातील 90 तर फक्त मुलीच आहेत. एका मुलीचा बाप असून या नालायक, बेशरम माणसाला लाज वाटत नाही…शी..शी अशी कॅप्शनही हसीन जहाने दिली आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी हसनीने मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. मोहम्मद शमीच्या पत्नीनं त्याच्याविरोधात केसही दाखल केली होती.

दरम्यान बीसीसीआयने शमीचा परफॉर्मन्स पाहून त्याला आयपीएल आणि वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजेच शमीनेही या संधीचे सोने करत, यंदाच्या विश्वचषकात दोन सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

शमीची पुन्हा एकदा घातक गोलंदाजी, वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा

आधी फलंदाजी आणि नंतर हवेत झेल, धोनीला चाहत्यांचा सलाम