आधी फलंदाजी आणि नंतर हवेत झेल, धोनीला चाहत्यांचा सलाम

वेस्ट इंडिजचा भारताने तब्बल 125 धावांनी धुव्वा उडवलाय. यासोबतच वेस्ट इंडिजचं या विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलंय. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी विंडीजच्या फलंदाजांना जेरीस आणत हा सामना भारताच्या खिशात घातला आणि आणखी दोन गुणांची कमाई केली.

आधी फलंदाजी आणि नंतर हवेत झेल, धोनीला चाहत्यांचा सलाम

लंडन : मँचेस्टरच्या मैदानात भारताने या विश्वचषकातला सलग पाचवा विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व कायम ठेवलं. विजयासाठी 269 धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजचा भारताने तब्बल 125 धावांनी धुव्वा उडवलाय. यासोबतच वेस्ट इंडिजचं या विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलंय. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी विंडीजच्या फलंदाजांना जेरीस आणत हा सामना भारताच्या खिशात घातला आणि आणखी दोन गुणांची कमाई केली. मोहम्म शमीने गेल्या सामन्यात हॅट्ट्रिक आणि या सामन्यात 4 विकेट्स घेत मोलाचं योगदान दिलं.

त्याआधी भारताचा डाव संथ फलंदाजीमुळे चर्चेत राहिला. पण महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या दोन षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 7 बाद 268 धावा करता आल्या. कर्णधार विराट कोहलीने यामध्ये 72, हार्दिक पंड्या 46 आणि केएल राहुलने 48 धावांचं योगदान दिलं. रोहित शर्मा (18), विजय शंकर आणि केदार जाधव यांना मोठी खेळी करता आली नाही. धोनीने फलंदाजीसोबतच यष्टीरक्षक म्हणून बजावलेल्या कामगिरीबाबतही चाहत्यांकडून त्याचं कौतुक होतंय.

37 वर्षीय धोनीने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर घेतलेला झेल पाहून चाहत्यांना अभिमान वाटला असेल यात नवल नाही. आजही तेवढाच फिट असलेल्या धोनीने आपण अजून संघात का आहोत याचं उत्तर दिलं. धोनीने अगोदर संथ फलंदाजी केली, पण अखेरच्या 16 षटकांमध्ये त्याने मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. शिवाय यष्टीरक्षण करतानाही मोलाची भूमिका निभावली.

VIDEO : धोनीेने घेतलेला झेल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *