AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंस्टावर एक पोस्ट करण्याचे विराट कोहली याला किती कोटी मिळतात? टेस्ट आणि टी 20 निवृत्तीनंतर वाढली फी ?

Virat Kohli : विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक चाहते असलेला खेळाडू आहे. भारताचा हा स्टार खेळाडू इंस्टावर एक पोस्ट टाकण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतो असे म्हटले जाते. काय आहे या मागचे सत्य...

इंस्टावर एक पोस्ट करण्याचे विराट कोहली याला किती कोटी मिळतात? टेस्ट आणि टी 20 निवृत्तीनंतर वाढली फी ?
Virat Kohli
| Updated on: Oct 12, 2025 | 10:29 PM
Share

सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने खेळाच्या मैदानासह जाहीरात आणि इतर क्षेत्रातही बाजी मारली आहे. विराटची फॅन फॉलाईंग मोठी आहे. कोहली यासमयी इंस्टाग्राम सर्वाधिक फॅन फॉलोईंग असणारा खेळाडू आहे. विराट कोहलीचे इंस्टावर 273 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. विराटच्या या फॅन फॉलोईंगमुळे तो अनेक कंपन्यांचे पेड प्रोमोशन देखील करतो. यासाठी विराट कोहली याला इंस्टाग्रामवर एक पोस्ट कोलोबोरेशनसाठी कोट्यवधी रुपयांची बिदागी मिळत असते.

इंस्टावर एक पोस्ट टाकण्यासाठी विराटची फि किती ?

विराट कोहली भारतीय क्रिकेटचा फेस आयकॉन बनला आहे. भारताच्या या स्टार फलंदाजाचे चाहते संपूर्ण जगात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्याचे सुमारे 1.4 मिलियन डॉलर घेतो. भारतीय चलनात ही रक्कम 12.5 कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम आहे. विराट कोहली सोशल मीडियावर अनेक मोठ्या ब्रँडसाठी प्रमोशन करतो. यात फिलिप्स, PUMA आणि MRF टायर्स सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. तसेच इंस्टाग्राम मार्फतही प्रसिद्ध पर्सनालिटींना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी तगडी रक्कम दिली जाते. परंतू या संदर्भात विराटने कधीही त्याला एका पोस्टसाठी किती पैसे मिळतात याबद्दल सांगतलेले नाही.

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा

विराट कोहली गेल्या सात महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता विराट ऑस्ट्रेलियाच्या विरोधात १९ ऑक्टोबरपासून वनडे सिरीजमध्ये खेळणार आहे. विराटने टेस्ट आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोहली जेव्हा या दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळत होता, तेव्हा इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी १२ कोटी स्वीकारत होता.विराट संदर्भात दोन वर्षांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती त्यात तो सोशल मीडियातून ११ कोटी रुपये कमावतो असे म्हटले होते. रेडिटच्या बातमीनुसार विराटने एक पोस्ट शेअर करुन याचा इन्कार केला होता.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.