Virat Kohli : विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रत्येक मॅच खेळण्यासाठी विराट कोहलीला किती पैसा मिळणार?
Virat Kohli match fees in Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रत्येक मॅच खेळण्यासाठी विराट कोहलीला किती पैसा मिळणार? 24 डिसेंबरपासून ही टुर्नामेंट सुरु होत आहे. 2010 नंतर विराट कोहली पहिल्यांदा या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसणार आहे.

Virat Kohli play for Delhi in Vijay Hazare Trophy : येत्या 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी टुर्नामेंट सुरु होणार आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी विराट कोहलीने होकार दिला आहे. कोहलीच्या या होकारामुळे क्रिकेट फॅन्सचा उत्साह आणखी वाढला आहे. कारण विजय हजारे ट्रॉफी देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा आहे. अनेक वर्षानंतर कोहली या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट खेळणार आहे, यावर DDCA ने सुद्धा शिक्कामोर्तब केलं आहे.
विराट कोहलीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टेस्ट आणि T20 फॉर्मेटमधून रिटायरमेन्ट घेतली आहे. आता तो फक्त वनडेमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करतो. तिथे एक मॅच खेळण्यासाठी त्याला 6 लाख रुपये मिळतात. 50 ओव्हर फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो खेळण्यासाठी उतरेल, तेव्हा एका मॅचसाठी त्याला किती पैसे मिळतील?.
दिल्लीचे एकूण किती सामने?
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट आपली घरची टीम दिल्लीकडून खेळणार आहे. टुर्नामेंटमध्ये दिल्लीच शेड्यूल पाहिलं तर 24 डिसेंबरला त्यांचा सामना आंध्र प्रदेश विरुद्ध आहे. 26 डिसेंबरला गुजरात विरुद्ध आणि 29 डिसेंबरला सौराष्ट्राविरुद्ध आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला दिल्लीच्या टीमचा सामना ओदिशा विरुद्ध आहे. 3 जानेवारीला दिल्ली सर्विसेज विरुद्ध खेळणार आहे. 6 जानेवारीला दिल्लीचा सामना रेल्वे विरुद्ध होईल. 8 जानेवारीला दिल्लीचा शेवटचा सामना हरियाणा विरुद्ध आहे.
विराट किती मॅचमध्ये खेळणार?
आता प्रश्न हा आहे की, विराट कोहली यामध्ये किती सामना खेळणार आहे? तो संपूर्ण विजय हजारे ट्रॉफी खेळणार का?. उत्तर आहे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली विजय हजारे ट्ऱॉफी 2025-26 मध्ये फक्त तीन मॅच खेळताना दिसू शकतो. या टुर्नामेंटचे पहिले दोन सामने आणि 6 जानेवारीला रेल्वे विरुद्ध होणारा सामना आहे.
विराट कोहलीला किती पैसे मिळणार?
विराट कोहली 2010 नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. त्याला प्रत्येक मॅचसाठी 60 हजार रुपये मिळतील. विजय हजारे ट्रॉफी खेळणाऱ्या सिनिअर खेळाडूंना इतकी फी मिळणार आहे. विराट कोहलीने 3 सामने खेळले, तर त्याला 1 लाख 80 हजार रुपये मिळतील.
