AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहली याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी मोठा निर्णय, 16 वर्षानंतर…

Virat Kohli Cricket : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने मोठा निर्णय घेतला आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी विराटच्या निर्णयाबाबत माध्यमांना काय माहिती दिलीय? जाणून घ्या.

Virat Kohli : विराट कोहली याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी मोठा निर्णय, 16 वर्षानंतर...
Virat Kohli Indian Cricket TeamImage Credit source: PTI
| Updated on: Dec 02, 2025 | 11:09 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टी 20i आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने मोठा निर्णय घेतला आहे. विराटने 16 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या वनडे सीरिज दरम्यान डीडीसीए अर्थात दिल्ली डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांना याबाबतची माहिती दिली आहे. विराट देशांतर्गत क्रिकेटेमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व करतो.

विराटने लिस्ट ए क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याचं डीडीसीएला कळवलं आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंना विराटसोबत खेळण्याची संधी मिळेल. तसेच चाहत्यांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर विराटने डीडीसीएला खेळणार असल्याचं कळवलंय.

‘विराट’ निर्णय, 16 वर्षानंतर कमबॅक होणार

बहुप्रतिक्षित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला 24 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी उपलब्ध असल्याच सांगितलंय, अशी माहिती रोहन जेटली याने पीटीआयला दिलीय. या निमित्ताने विराट तब्बल 16 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विराट विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2010 साली सर्व्हिसेज विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.

विराट एकदिवसीय क्रिकेटमध्येच सक्रीय

विराट सध्या फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळतो. विराटने 2024 वर्ल्ड कप फायनलनंतरच टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच विराटने अवघ्या काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने रोहित आणि विराटला फिटनेस आणि कामगिरीवर लक्ष द्यायला सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विराटने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

डीडीसीए अध्यक्ष रोहन जेटली यांची प्रतिक्रिया काय?

विराट कोहली याने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी उपलब्ध असणार, अशी माहिती दिली आहे. विराट किती सामने खेळणार? हे निश्चित नाही. विराट असल्याने ड्रेसिंग रुममध्ये प्रोत्साहन मिळेल”, असा विश्वास रोहन जेटली यांनी व्यक्त केला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.