
Champions Trophy 2025, IND vs BAN : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात भारताने बांगलादेशवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने 228 धावांचे लक्ष्य समोर ठेवले. भारतीय संघाने हे टार्गेट 21 चेंडू आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. मात्र 35 धावांवर 5 विकेट्स गेलेल्या असताना बांगलादेशचा संघ एवढी मोठी धावसंख्या उभारू शकेल असं कोणालाच वाटल नव्हतं. ते 100 धावा तरी करतील का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र जाकर अली आणि तौहीद हिरदॉयच्या 154 धावांच्या शानदार भागीदारीमुळे बांगलादेशने मोठी धावसंख्या उभारली. या मॅचदरम्यान रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला खूपच महागात पडली. रोहित शर्माने जाकर अलीचा सोपा क2च सोडला नसता तर आज चित्र काही वेगळं दिसलं असतं. आणि अक्षर पटेलची हॅटट्रिकही चुकली नसती.
मॅचनंतर या चुकीबद्दल रोहित शर्मा स्पष्टच बोलला. तो सोपा कॅच सोडल्यामुळेआपण स्वत: किती दु:खी आहोत हे तर रोहितने सांगितलंच पण हॅटट्रिक हुकवल्याबद्दल आपण अक्षरची कशी माफी मागू हेही त्याने स्प्षट केलं.
काय बोलला रोहित शर्मा ?
बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना 9 व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला. त्याने आपल्या षटकात दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. त्यामुळे बांगलादेशचा संघ प्रचंड दबावात होता. हॅटट्रिकसाठी अक्षरने पुढला चेंडू टाकला खरा पण त्याचवेळी रोहित शर्माने माती खात मोठ्ठी चूक केली. हॅटट्रीक बॉलवर रोहितने जाकरचा सोपा कॅच सोडला आणि सर्व खेळाडूंसह संपूर्ण मैदानही हळहळलं. तो कॅच सोडल्यावर रोहितही स्वत:च्या चुकीवर प्रचंड नाराज होता, जमिनीवर हात जोरात आपटून त्याने त्याची निराशाही व्यक्त केली.
अखेर मॅच संपल्यानंतर त्याला या चुकीवर प्रश्न विचारलं जाणं अपेक्षितच होतं. मात्र यावर रोहितने विनोदी पद्धतीने उत्तर दिलं.. मी अक्षर पटेलला जेवायला घेऊन जाईन आणि माफी मागणार असल्याचं त्याने सांगितलं. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “मी त्याला (अक्षर पटेल) उद्या डिनरसाठी बाहेर घेऊन जाऊ शकतो. तो एक सोपा झेल होता. मी स्लिपमध्ये उभं राहून तो झेल घ्यायला हवा होता, पण अशा गोष्टी घडतात.” अस रोहित म्हणाला. ती ओव्हर संपल्यानंतर रोहित सरळ अक्षर पटेलकडे गेला आणि दोन्ही हात जोडून त्याने आपल्या चुकीसाठी माफी मागितली होती.
Rohit Sharma said “May take him for dinner tomorrow (smiles) – it was an easy catch, I should have taken that”. [Talking about the drop catch of Hat-trick ball] pic.twitter.com/qagPyZNreB
— Johns. (@CricCrazyJohns) February 20, 2025
मला वाटलं मी हॅटट्रिक घेतली पण…
दरम्यान पहिल्या डावात हॅटट्रिक चुकवल्यानंतर अक्षर पटेलही यावर बोलला. “बरंच काही घडले. मला माहित नव्हते की (तनजीद हसनची विकेट) तो बाद आहे, पण केएल राहुलने अपील केले आणि तो आऊट झाला. त्यानंतर, मला दुसरी विकेट मिळाली. तिसऱ्या चेंडूवर जेव्हा कट लागला तेव्हा मला वाटलं की मी हॅटट्रिक घेतली. मी लगेच सेलिब्रेट करायला सुरुवातही केली, पण तेवढ्यात रोहित शर्माने कॅच सोडल्याचं मी पाहिलं. मी तेव्हा काहीच प्रतिक्रिया दिल नाही. चूक तर प्रत्येकाकडून होते ” असं म्हणत अक्षरने तो विषय फार वाढवला नाही.