IND vs SA Final : भांगडा करत नाचत आली, ट्रॉफी स्वीकारण्यापूर्वी हरमनप्रीतने केला जय शाह यांना नमस्कार; Video व्हायरल
Harmanpreet Kaur - Jay Shah: हरमनप्रीत कौरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. वर्ल्डकप जिंकल्यावर ट्रॉफी स्वीकारण्यापूर्वी तिने जे केलं ते पाहून सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून येईल.

Women’s World Cup 2025 : रविवार, 2 नोव्हेंबरच्या रात्री भारतीय महिला क्रिकेट टीमने इतिहास रचला. भारताने पहिल्यांदाच महिला वनडे वर्ल्डकप जिंकला आणि उत्साहाला उधाण आलं. याआधीही भारतीय संघाला अशी लंधी मिळाली होती. 2005 साली आणि 2007 साली भारतीय संघ वर्ल्डकप ट्रॉफीच्या अगदी समीप पोहोचली होती. मात्र फायनलमध्ये पोहोचून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यंदा, तिसऱ्यांदा भारतीय संघाने ही चूक केली नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघना सरसर कामगिरी केली आणि महिला संघाने वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय महिला संघाला वर्ल्डकप ट्रॉफी प्रदान केली.
मात्र ही ट्रॉफी स्वीकारण्यापूर्वी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने जे केलं तो पाहून अनेकांना तिचा अभिमान वाटेल. तिच्या कृत्याने तिची नम्रता दिसून आली. वर्ल्डकप ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर आलेली हरमनप्रीत कौर भांगडा करतच तिथे पोहोचली. त्यानंतर तिने जय शाह यांना वाकून नमस्कार केला आणि मग ही ट्रॉफी स्वीकारत एकच जल्लोष केला.
भांगडा करत हरमनप्रीतचं अनोखं सेलिब्रेशन
सोशल मीडियावर या प्रेझेंटेशन सेरेमनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यासाठी पोहोचताना दिसली. मात्र ट्रॉफी स्वीकारण्याची तिची पद्धत खरोखरच अनोखी होती. कारण मंचावर आलेल्या हरमनीप्रीतने आधी बिनधास्त अंदाजात भांगडा केला, नाचत नाचतच ती जय शाह यांच्यापर्यंत पोहोचली, हे सर्व दृश्य व्हिडीओमध्ये कैद झालं.
WHAT A BEAUTIFUL MOMENT TEAM INDIA WITH WORLD CUP TROPHY.🥹🇮🇳 pic.twitter.com/hYHeWbrTot
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 2, 2025
हरमनप्रीतने जय शाह यांना केला नमस्कार
भांगडा नृत्य करत आलेली हरमनप्रीत ही जय शाह यांच्या जवळ पोहोचली. पण त्यानंतर तिने जे केलं ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. ट्रॉफी हातात घेण्यापूर्वी, ती स्वीकारण्यापूर्वी, हरमनप्रीत हिने ICC चेअरमन जय शाह यांना नमस्कार केला, ती त्यांच्या पाया पडली. मात्र जय शाह यांनी तिला तसं करण्यापासून रोखलं. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.
जय शहा यांनी केलं अभिनंदन
जय शाह यांनी केवळ तिला फक्त वर्ल्डकपची ट्रॉफी हातात दिली नाही. तर त्यांनी एक्स ( आधीचे ट्विटर) वरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून हरमनप्रीत कौर आणि भारतीय संघाचे. ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदनही केले. काल ( 2 नोव्हेंबर) नवी मुंबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे विजेतेपद जिंकले.
