डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानात असता तर कधीच टेस्ट क्रिकेट खेळू शकला नसता, माजी पाक क्रिकेटरचा सिलेक्टर्सवर निशाणा

| Updated on: May 27, 2021 | 3:03 PM

"डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानात असता तर त्याला कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसती", असं म्हणत पाकिस्तानच्या सोहेब मकसूदने टीम मॅनेजमेंटच्या मानसिकतेवर प्रहार केला आहे. (david warner Sohaib Maqsood)

डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानात असता तर कधीच टेस्ट क्रिकेट खेळू शकला नसता, माजी पाक क्रिकेटरचा सिलेक्टर्सवर निशाणा
David Warner
Follow us on

मुंबई : पाकिस्तान क्रिकेटमधील दररोज एखादा क्रिकेटपटू आपल्या यंत्रणेला शिव्या देत असतो. टीम मॅनेजमेंटवर सतत प्रश्न उपस्थित करत असतो. पाकिस्तानचा फलंदाज सोहेब मकसूद (Sohaib Maqsood) याचं नाव आता या यादीत आलं आहे. संघाच्या निवडीबाबत त्याने निवडकर्त्यांना धारेवर धरत, “डेव्हिड वॉर्नर (David Warner) पाकिस्तानात असता तर त्याला कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसती”, असं म्हटलं आहे. हे वक्तव्य करताना टीम मॅनेजमेंटच्या मानसिकतेवर त्याने प्रहार केला आहे. (if david warner Was in Pakistan he would not have played test Cricket Says Pakistan Sohaib Maqsood)

पाकिस्तान संघ व्यवस्थापनाची अशी मानसिकता….

पाकिस्तान संघ व्यवस्थापनाची अशी मानसिकता आहे की येथे वेगात धावा करणाऱ्या फलंदाजांची कसोटी क्रिकेटसाठी निवड केलेली नाही. त्यामुळेच माझी कसोटी कारकीर्द पुढे जाऊ शकली नाही. कारण पाकिस्तानात असं मानलं जातं की वेगवान फलंदाजांनी केवळ टी -20 आणि एकदिवसीय सामने खेळला पाहिजेत, असं 34 वर्षीय पलंदाज सोहेब मकसूद म्हणाला.

पण मला स्थान देण्यात आलं नाही…!

मकसूदने पाकिस्तानकडून 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 735 रन्स तर 20 टी -20 सामन्यात 221 धावा केल्या. 2012-2013 च्या हंगामात मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होतो मला कसोटी संघात स्थान देण्यात आले नाही, असं तो म्हणाला.

वॉर्नर पाकिस्तानमध्ये असता तर त्याची कसोटीत निवड झाली नसती

“कसोटी क्रिकेटवर सध्या माझं लक्ष नाहीय. 2013 मध्ये जेव्हा मी संघात आला तेव्हा माझं लक्ष वन डे आणि कसोटीवर होतं. मी स्वत: ला टी -20 खेळाडू मानला नाही. मी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी करत होतो. फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेटमधील माझी सरासरी 50 च्या आसपास होती. पाकिस्तानमध्ये अशी एक संस्कृती होती की, जर खेळाडू वेगवान धावा करतो तर तो फक्त एकदिवसीय आणि टी -20 खेळू शकतो. पण वीरेंद्र सेहवाग याचं उत्तम उदाहरण आहे, की तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये लिलया खेळायचा. मला वाटतं डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानमध्ये असता तर त्याची कसोटीत निवड झाली नसती”, असं मकसूद म्हणाला.

(if david warner Was in Pakistan he would not have played test Cricket Says Pakistan Sohaib Maqsood)

हे ही वाचा :

Photo : मला मिस्टर राईट हवाय, टीम इंडियाच्या विजयानंतर कपडे उतरवणाऱ्या अर्शी खानची इच्छा

माजी सिलेक्टर किरण मोरे यांचा मोठा दावा, विराट कोहलीऐवजी ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार होणार!

Birthday Special : मुंबई इंडियन्सचा कोच, श्रीलंकेचा रेकॉर्डवीर, क्रिकेटमध्ये मोठे रेकॉर्ड