
IIT Baba prediction on IND vs PAK Match : आयसीसी टुर्नामेंटमध्ये परंपरागत हाडवैरी भारत आणि पाकिस्तान भिडतील. या सामन्याची भारतासह सर्वच क्रिकेटप्रेमींना मोठी उत्सुकता आहे. सध्या दोन्ही देशांचे संबंध ताणल्या गेलेले आहेत. तर भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने भारताचे सर्व सामने दुबईत होत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये हायहोल्टेज सामना होईल. तर महाकुंभात स्वत: भोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण केलेले लोकप्रिय आयआयटी बाबा यांनी या सामन्याविषयी मोठे भाष्य केले आहे. त्यांच्या या भविष्यवाणीने मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे चाहते चांगलेच भडकले आहेत. त्यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कोणता संघ जिंकणार याविषयी त्यांनी असा दावा केला आहे…
काय आहे IIT वाल्या बाबाची भविष्यवाणी?
भारत-पाकिस्तानचा सामना होण्यापूर्वी IIT बाबा अभय सिंह यांनी कोणता संघ जिंकणार याविषयीची भविष्यवाणी केली आहे. एका युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी या महासामन्याविषयी भाष्य केले. परंपरागत हाडवैऱ्यांच्या या सामन्यात पाकिस्तान बाजी मारेल. पाकिस्तानचा संघ जिंकेल असा दावा या बाबांनी केला. विराट कोहली आणि इतर खेळाडुंनी कितीही मेहनत घेतली. कसरत केली तरी त्यांना विजय चकवा देणार असे बाबा म्हणाले. आयआयटी बाबाच्या या भविष्यवाणीने एकच खळबळ उडाली आहे. ते आत जमके ट्रोल होत आहेत. त्यांच्यावर युझर्स तोंडसुख घेत आहेत. त्यांच्याविरोधात कमेंटचा पाऊस पडला आहे.
पहिल्याच सामन्यात पाकचा बिमोड
ICC Champions Trophy 2025 मधील गट अ मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला घाम फोडला. किवी संघाने त्यांना चांगलेच झुंजवले. या सामन्यात पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव झाला. हा सामना कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. घरच्या मैदानावरच किवी संघाने पाकिस्तानला धूळ चारली. त्यामुळे पाकिस्तानला आता भारतासोबतच्या सामन्यात करो वा मरो अशी स्थिती आहे. त्यातच बाबाच्या भविष्यवाणीने आता भारतीय चाहते चिंतेत सापडले आहेत. तर काहींनी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, असा टोला बाबांना लगावला आहे.