Maya Sonawane : क्रिकेट असो की जिम्नॅस्ट… महिला आयपीएलमध्ये गोलंदाजाची अप्रतिम अ‍ॅक्शन पाहून सगळेच हैराण

| Updated on: May 26, 2022 | 9:06 AM

महिला सीनियर टी20 ट्रॉफीमध्ये तिच्या शानदार गोलंदाजीमुळे महिला टी20 चॅलेंजमध्ये स्टार खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे.

Maya Sonawane : क्रिकेट असो की जिम्नॅस्ट... महिला आयपीएलमध्ये गोलंदाजाची अप्रतिम अ‍ॅक्शन पाहून सगळेच हैराण
माया सोनवणे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) महिला टी-20चॅलेंजचे (Women’s T20 Challenge) सामनेही सुरू झाले आहेत. ही 4 सामन्यांची लीग सुपरनोव्हा (velocity), ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी यांच्यात खेळवली जात आहे. सुपरनोव्हासने पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सचा 49 धावांनी पराभव केला. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना व्हेलॉसिटीविरुद्ध 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सुपरनोव्हास आणि वेलोसिटी यांच्यातील दुसऱ्या सामन्यात माया सोनवणेला खेळण्याची संधी मिळाली आणि तिची गोलंदाजी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. माया सोनवणे (Maya Sonawane) लेगस्पिन गोलंदाजी करते. गोलंदाजी करताना तिचं डोकं खाली जातं. ती तिच्या गुडघ्यात खूप वाकते. 11व्या षटकात कर्णधाराने मायाला पहिल्यांदा गोलंदाजी दिली आहे. पहिला चेंडू टाकताच ती चर्चेत आली. मात्र, तिला गोलंदाजीत काही चमत्कार करता आला नाही. दोन षटकांत 19 धावा दिल्यानंतर कर्णधार दीप्ती शर्माने त्याला गोलंदाजीची संधी दिली नाही.

माया दुसऱ्या क्रमांकावर

महिला सीनियर टी20 ट्रॉफीमध्ये तिच्या शानदार गोलंदाजीमुळे महिला टी20 चॅलेंजमध्ये स्टार खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राचा संघ सीनियर टी-२० ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्या स्पर्धेतयाने 8 सामन्यात 11 विकेट घेतल्या होत्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुपरनोव्हासने पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सचा 49 धावांनी पराभव केला. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना व्हेलॉसिटीविरुद्ध 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

हे सुद्धा वाचा

विशेष कामगिरी

दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकी गोलंदाज पॉल अ‍ॅडम्सची बॉलिंग अ‍ॅक्शन अशीच होती. त्याच्या नावावर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत 134 आणि एकदिवसीय सामन्यात 29 बळी आहेत. त्याच्याशिवाय पंजाबमध्ये जन्मलेल्या शिविल कौशिकची गोलंदाजीही अशीच होती. त्याने गुजरात लायन्ससाठी आयपीएलमध्ये 10 सामने खेळले, ज्यामध्ये त्याला 6 विकेट मिळाल्या.

माया सोनवणेला खेळण्याची संधी

सुपरनोव्हास आणि वेलोसिटी यांच्यातील दुसऱ्या सामन्यात माया सोनवणेला खेळण्याची संधी मिळाली आणि तिची गोलंदाजी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. माया सोनवणे लेगस्पिन गोलंदाजी करते . गोलंदाजी करताना तिचं डोकं खाली जातं. ती तिच्या गुडघ्यात खूप वाकते. 11व्या षटकात कर्णधाराने मायाला पहिल्यांदा गोलंदाजी दिली आहे. पहिला चेंडू टाकताच ती चर्चेत आली. मात्र, तिला गोलंदाजीत काही चमत्कार करता आला नाही. दोन षटकांत 19 धावा दिल्यानंतर कर्णधार दीप्ती शर्माने त्याला गोलंदाजीची संधी दिली नाही. दरम्यान, सुपरनोव्हास आणि वेलोसिटी यांच्यातील दुसऱ्या सामन्यात माया सोनवणेला खेळण्याची संधी मिळाली आणि तिची गोलंदाजी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.