IND vs AUS : कॅप्टन शुबमन गिल पण रोहित शर्माच्या शब्दाला टीममध्ये अजूनही तितकाच मान, घडलं असं की…

Team India Practice : एडिलेडमध्ये दुसरा वनडे सामना 23 ऑक्टोंबरला खेळला जाणार आहे. पर्थच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा पराभव झाला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियासाठी एडिलेड जिंकणं आवश्यक आहे.

IND vs AUS : कॅप्टन शुबमन गिल पण रोहित शर्माच्या शब्दाला टीममध्ये अजूनही तितकाच मान, घडलं असं की...
Team India Practice
Image Credit source: x
| Updated on: Oct 21, 2025 | 12:52 PM

Team India Practice ahead of 2nd ODI : पर्थमध्ये जे घडलं ते विसरुन आता एडिलेडमध्ये विजयाचा डंका वाजवायची वेळ आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्याआधी कंबर कसली आहे. मैदानावर रोहित शर्मा प्रतिस्पर्धी टीमच्या पहिल्या चेंडूचा सामना करतो. बरोबर तसच प्रॅक्टिस सेशनमध्ये तो बॅट घेऊन फलंदाजीसाठी पहिला उतरला. त्याने भरपूर प्रॅक्टिस केली. रोहितच्या पाठोपाठ विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर सुद्धा आले. म्हणजे टीम इंडियाची संपूर्ण टॉप ऑर्डर एकत्र एडिलेडच्या मैदानात नेट्समध्ये उतरली. या सगळ्यात खास बाब होती ती म्हणजे रोहित शर्मासमोर शुबमन गिलला फलंदाजी करताना पाहणं.

रोहित शर्माने फक्त शुबमन गिलला फलंदाजीच करताना पाहिलं नाही, तर त्याला काही चुकीच घडतय असं वाटलं तेव्हा शुबमनला नेट्समधून बाहेर बोलवून टिप्सही दिले. रोहित जेव्हा सांगत होता, तेव्हा गिल ते लक्षपूर्वक ऐकत होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये भारतीय इनिंगची सुरुवात करण्याची जबाबदारी या दोघांवरच आहे. अशावेळी गिलसाठी रोहितने दिलेले टिप्स महत्वाचे आहेत. खरंतर शुबमन गिल आता वनडे टीमचा कॅप्टन आहे. आधी ही जबाबदारी रोहित शर्माकडे होती. पण या घटनेमधून रोहितच्या शब्दाला टीममध्ये आजही किती किंमत आहे, ते दिसून येतं.

रोहितचा एडिलेडमधील हा कितवा सामना?

शुबमन गिलचा कॅप्टन म्हणूनच नाही, तर खेळाडू म्हणूनही एडिलेडमधील हा पहिला वनडे सामना आहे. रोहित शर्मा एडिलेडमध्ये आपला सातवा वनडे सामना खेळायला उतरेल. याआधीच्या 6 सामन्यात रोहित शर्माचा एडिलेडमध्ये रेकॉर्ड तितका चांगला राहिलेला नाही. त्याने एडिलेडमध्ये 6 सामन्यात 21.83 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. यात त्याचा बेस्ट स्कोर 43 आहे. मागच्या सहापैकी तीन वनडे रोहित एडिलेडध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आहे. त्याने 25.66 च्या सरासरीने 77 धावा केल्या.

एडिलेड विराट कोहलीच फेव्हरेट मैदान

विराट कोहलीने सुद्धा नेट्समध्ये भरपूर घाम गाळला. तो खूप फोकस वाटला. विराटची प्रॅक्टिस पाहून असं वाटलं की, पर्थमधल अपयश त्याला एडिलेडमध्ये पुसून टाकायचं आहे. एडिलेड विराट कोहलीच फेव्हरेट मैदान आहे.

विराटचा या मैदानावरील रेकॉर्ड काय?

एडिलेडमध्ये विराट कोहली आतापर्यंत चार वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 61 च्या सरासरीने दोन शतकांसह 244 धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याची ओव्हरऑल सरासरी सुद्धा 61 आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सरासरी सुद्धा 61 च आहे. विराट या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 वनडे सामने खेळला आहे. यात एकाशतकासह 122 धावा केल्या आहेत. त्यामुळे एडिलेडच्या मैदानात विराटची बॅट तळपू शकते. कदाचित या सामन्यात विराट कोहली सर्वाधिक धावा काढू शकतो.