AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 2nd Test: नाथन लायनच्या फिरकीपुढे आघाडीचे फलंदाज ढासळले, रोहित शर्माला बॉल कळलाच नाही, पाहा Video

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी आलेले सलामीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने आता डाव सावरल आहे.

IND vs AUS 2nd Test: नाथन लायनच्या फिरकीपुढे आघाडीचे फलंदाज ढासळले, रोहित शर्माला बॉल कळलाच नाही, पाहा Video
Video: नाथन लायनमुळे भारताची चिंता वाढली, रोहित शर्माची अशी काढली विकेटImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 18, 2023 | 12:44 PM
Share

दिल्ली : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची आघाडी फलंदाजी ढासळली. नाथन लायनच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांना तग धरणं कठीण झालं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताची बिनबाद 21 अशी स्थिती होती. मात्र खेळ सुरु झाल्यानंतर फलंदाज एक एक करत तंबूत परतले. रोहित शर्मा (32), केएल राहुल (17), चेतेश्वर पुजारा (0) आणि श्रेयस अय्यर (4) या धावसंख्येवर परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या धावसंख्येचा टप्पा तरी गाठणार का? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी नाथन लायन आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. लंचपर्यंत चार दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. इतकंच काय तर कर्णधार रोहित शर्माला त्याने टाकलेला चेंडूच कळला नाही. बाद झाल्यानंतर तंबूत परताना हा भाव रोहित शर्माच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता.

केएल राहुल हा नाथन लायचना पहिला बळी ठरला.केएल राहुल 17 धावसंख्येवर खेळत असताना त्याला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर पुढच्याच षटकात रोहित शर्मा गळाला लागला. फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला बाद केल्याने लायनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रोहित शर्माला त्याने टाकलेला चेंडू कळलाच. थेट स्टंपला चेंडू आदळ्याने त्रिफळा उडाला. समालोचन करणाऱ्या रवि शास्त्री यांनी तात्काळ प्रतिक्रिया नोंदवत सांगितलं की, “नो मॅन्स लँडमध्ये पकडल्यासारखं झालं.” पहिल्या कसोटी सामन्यात रोहितनं 120 धावांची खेळी केली होती.

रोहित शर्मा तंबूत परतत नाही तोच चेतेश्वर पुजारा हजर झाला. 100 व्या कसोटी सामन्यात त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. चेतेश्वर पुजारा नाथन लायनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर लायनच्या गोलंदाजीवर पीटर हँडस्कॉम्बनं श्रेयस अय्यरचा जबरदस्त झेल घेत माघारी पाठवलं. श्रेयसची निवड सूर्यकुमार यादवच्या जागेवर झाली आहे. श्रेयसनं 15 चेंडूत 4 धावा केल्या.  विराट कोहली आणि रविंद्र जडेजानं संघाची बाजू सावरत अर्धशतकी भागीदारी केली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.