मयांकला हटवा, रोहित शर्माला पाठवा, लक्ष्मणचा स्ट्रेट ड्राईव्ह, शतकाचा विश्वास

| Updated on: Jan 05, 2021 | 3:17 PM

सलामीवीर मयांक अग्रवालला हटवून, त्याच्या जागी नव्याने सामील झालेल्या रोहित शर्माला पाठवा. रोहित शर्मा सिडनीमध्ये शतक झळकावेल, असा विश्वास व्ही व्ही एस लक्ष्मणने व्यक्त केला.

मयांकला हटवा, रोहित शर्माला पाठवा, लक्ष्मणचा स्ट्रेट ड्राईव्ह, शतकाचा विश्वास
Follow us on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. एकीकडे दुखापतीचं ग्रहण, तर दुसरीकडे प्लेईंग इलेव्हनचं टेन्शन, अशा परिस्थितीत भारतीय संघ सिडनी कसोटीला सामोरं जात आहे. दुखापतीमुळे आधीच के एल राहुल (K L laxman) बाहेर पडला आहे. आता आणखी दुखापत न होता, मालिकेत आघाडी घेण्याचा मानस कर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आहे. या पार्श्वभूमीवर माजी कसोटीवीर व्ही व्ही एस लक्ष्मणने (VVS Laxman) टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे. (Ind Vs Aus VVS Laxman on mayak Agrawal And Rohit Sharma)

सलामीवीर मयांक अग्रवालला हटवून, त्याच्या जागी नव्याने सामील झालेल्या रोहित शर्माला पाठवा. रोहित शर्मा (Rohit Sharma) सिडनीमध्ये शतक झळकावेल, असा विश्वास व्ही व्ही एस लक्ष्मणने व्यक्त केला.

लक्ष्मण म्हणाला, “ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी रोहित शर्मासाठी अनुकूल आहे. उपकर्णधार असलेला रोहित शर्मा नव्या चेंडूचा उत्तम सामना करतो. त्यामुळे सिडनीच्या मैदानात मोठी खेळी करुन तो शतक झळकावू शकतो.”

आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक सामन्यांना मुकला. शिवाय पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही त्याला स्थान मिळालं नाही. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत.

लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, मयांक अग्रवाल सध्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे रोहितला त्याच्या जागी स्थान मिळायला हवं. मयांकने या मालिकेत 17, 09, 00 आणि 05 धावा केल्या आहेत.

लक्ष्मण म्हणाला, “भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून उत्तम कमबॅक केलं. आता रोहित शर्माही तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज असल्याने भारताची बाजू आणखी भक्कम होत आहे. विराट कोहली सध्या टीममध्ये नाही. त्यामुळे रोहित शर्माचा अनुभव उपयोगी येईल. सिडनीमध्ये 2-1 अशी आघाडी घेऊन, भारताला मालिका 3-1 ने जिंकण्याची संधी आहे”.

शतकाची अपेक्षा

रोहित शर्मा आपलं कौशल्य दाखवू शकतो. मला वाटतं त्याची शैली ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांसाठी अनुकूल आहे. जर रोहित शर्मा टिकला, तर तो नव्या चेंडूचा चांगला समाचार घेऊ शकतो. इतकंच नाही तर या खेळपट्टीवर तो शतक झळकावेल, असा विश्वास लक्ष्मणने व्यक्त केला.

रोहित शर्माने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या रोहितने आतापर्यंत केवळ 32 कसोटी सामने खेळले आहेत. (Ind Vs Aus VVS Laxman on mayak Agrawal And Rohit Sharma)

हे ही वाचा

Sydney Test | भारताला मोठा झटका, दुखापतीमुळे तिसरा खेळाडू मायदेशी

रोहितचं एका शब्दात वर्णन कर, शोएब अख्तरच्या उत्तराने चाहत्यांची दांडी गुल