AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहितचं एका शब्दात वर्णन कर, शोएब अख्तरच्या उत्तराने चाहत्यांची दांडी गुल

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (एमएस धोनी) आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा या दोघांचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर सीमेपलीकडे पाकिस्तानातही आहेत.

रोहितचं एका शब्दात वर्णन कर, शोएब अख्तरच्या उत्तराने चाहत्यांची दांडी गुल
Shoaib Akhtar
| Updated on: Jan 05, 2021 | 10:35 AM
Share

इस्लामाबाद : असं म्हटलं जातं की लोकप्रियतेला मर्यादा नसते. अशीच लोकप्रियता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (एमएस धोनी) आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा यांनांही लाभली आहे. भारतीय क्रिकेटच्या या दोन हिऱ्यांचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर सीमेपलीकडे पाकिस्तानातही आहेत. (Rohit Sharma and Mahendra Singh Dhoni have fans in Pakistan Too)

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhta) सोशल मीडियावरील प्रश्‍नोत्तराच्या सत्रात धोनी आणि रोहितच्या पाकिस्तानातील लोकप्रियतेचा अनुभव घेता आला. या सत्रामध्ये अख्तरने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण, त्यातील सर्वात मोठा प्रश्न धोनी आणि रोहितबाबत होता. (Shoaib Akhtar reply to question on Rohit Sharma and MS Dhoni)

शोएब अख्तरच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात जगभरातील अनेक क्रिकेट चाहते सहभागी झाले होते. पाकिस्तानसह भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही यात भाग घेतला. एका भारतीय चाहत्याने अख्तरला रोहितबाबत एक प्रश्न विचारला तर एका पाकिस्तानी चाहत्याने धोनीबाबतचा एक सवाल उपस्थित करत बाऊन्सर टाकला. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देत अख्तरने रोहित आणि धोनीच्या चाहत्यांची मनं जिंकली.

रोहितसाठी शब्द नाही : अख्तर

भारतीय क्रिकेट चाहत्याने ट्विटरवर पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाला रोहित शर्माविषयी प्रश्न केला आणि एका शब्दात भारतीय क्रिकेटच्या हिटमॅनचे कौतुक करण्यास सांगितले. यावर उत्तर देताना अख्तरने म्हटले की, “असा शब्द मिळाला की मी तुम्हाला सांगेन”. म्हणजे अख्तरच्या म्हणण्यानुसार असा शब्द अद्याप बनलेला नाही जो रोहित शर्माच्या क्षमतेचं वर्णन करू शकेल.

धोनी एका युगाचं नाव आहे : अख्तर

अख्तरसाठी पुढचा प्रश्न धोनीबद्दल होता. परंतु धोनीबद्दलचा प्रश्न विचारणारा चाहता भारतीय नव्हे तर एक पाकिस्तानी होता. या पाकिस्तानी चाहत्याने विचारले की, धोनीबद्दल काय सांगशील? यावर अख्तर म्हणाला की, धोनी हे एका युगाचं नाव आहे.

हेही वाचा

जगातील सर्वात घातक गोलंदाज कोण? शोएब अख्तरने घेतलं भारतीय खेळाडूचं नाव

शोएब अख्तरची फेकूगिरी, काश्मीर काबीज करुन भारतावर हल्ला करु, ‘गजवा ए हिंद’चं स्वप्न

शोएब अख्तर यांनी त्यांचा देश सांभाळावा; काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी फटकारले

(Shoaib Akhtar reply to question on Rohit Sharma and MS Dhoni)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.