AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब अख्तर यांनी त्यांचा देश सांभाळावा; काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी फटकारले

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने काश्मीर आणि भारताबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शोएब अख्तर यांनी त्यांचा देश सांभाळावा; काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी फटकारले
| Updated on: Dec 25, 2020 | 8:14 PM
Share

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने काश्मीर आणि भारताबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “शोएब अख्तर यांनी त्यांचा देश सांभाळावा”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शोएबला फटकारले आहे. “आधी काश्मीर (Kashmir) काबीज करु आणि त्यांनंतर भारतावर हल्ला करु” असं धक्कादायक विधान शोएबनं केलं होतं. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Shoaib Akhtar should think about his country; Sanjay Raut Slams Akhtar)

पाकिस्तानमधील समा टीव्ही (Pakistan Sama TV) या वृत्तवाहिनीतील एका मुलाखतीदरम्यान शोएब बरळला आहे. त्यानं ही सगळी गोष्ट गजवा ए हिंद ( Ghazwa e Hind ) या काल्पनिक कट्टरतावादी विचारधारेतून सांगितली आहे. समा टीव्हीच्या वृत्तनिवेदिकेनं याबाबत शोएबला प्रश्न विचारला, तेव्हा त्यानं हे उत्तर दिलं. शोएबचं हे विधान आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे, आणि भारतीयांकडून शोएबवर टीकेची झोड सुरु झाली आहे.

‘गजवा ए हिंद’ची आहे तरी काय?

पाकिस्तानातल्या कट्टरतावादी विचारसरणीतून तयार झालेली काल्पनिक अशी गजवा ए हिंद ( Ghazwa e Hind) ही भविष्यवाणी. या भविष्यवाणीवरच पाकिस्तानमध्ये दहशतवादी निर्माण करण्याचा कारखाने सुरु आहेत. पाकिस्तानात कट्टरतावादी विचारसरणीचे लोक याच भविष्यवाणीला आधार मानत काश्मीरवर दावा करतात. या भविष्यवाणीत लिहलंय की, एक दिवस अखंड भारत, बांग्लादेश, म्यानमार, भूतान, नेपाळवर मुस्लिम शासन असेल. यासाठी एक मोठं युद्ध होईल. या युद्धात रक्ताच्या नद्या वाहतील, आणि हे युद्ध मुस्लिम शासक जिंकतील, आणि सगळ्या हिंदूस्तानावर मुस्लिमांचा झेंडा फडकेल.

शोएबला गजवा ए हिंद’ची स्वप्न

समा टीव्हीला दिलेला मुलाखतीत शोएब म्हणतो की, या युद्धात नद्या दोनदा रक्तानं लाल होतील. अफगाणिस्ताहून सेना अटकपर्यंत पोहचेल, उजबेकिस्तानहूनही अनेक तुकड्या भारतापर्यंत पोहचतील. या सगळा भाग लाहोरशी जोडला जाईल. काश्मीरवर ताबा मिळवल्यानंतर भारतावर आक्रमण होईल. भारताचे शासक बेड्यांमध्ये जखडले जातील असंही शोएब सांगतोय.

शोएब आधीही अनेक विधानांमुळे वादात

शोएब याआधीही भारताविरोधात गरळ ओकत आला आहे. मात्र ती गरळ पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेटपटूंपुरती मर्यादित होती. मात्र आता तो थेट भारतावर हल्ला करण्याचं बोलतो आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान ड्रग्ज घेण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गोलंदाजीची गती वाढवण्यासाठी त्याला ड्रग्ज घेण्यासाठी सांगण्यात आलं. यासाठी दबावही टाकण्यात आला, मात्र आपण ड्रग्ज घेतलं नाही असं तो म्हणाला होता.

शोएब काय म्हणाला, तुम्हीच ऐका:

संबंधित बातम्या: 

गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण….. : शोएब अख्तर   

IPL 2020 | ….म्हणून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी नाही, शाहिद आफ्रिदीची खदखद

(Shoaib Akhtar should think about his country; Sanjay Raut Slams Akhtar)

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.