AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण….. : शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे (Shoaib Akhtar said will eat grass to increase Pakistan army budget).

गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण..... : शोएब अख्तर
| Updated on: Aug 07, 2020 | 4:41 PM
Share

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब नेहमी त्याच्या अतिशयोक्ती वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्याच्या वक्तव्यांमुळे त्याला नेटीझन्सकडून अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं आहे. त्याने आता पुन्हा एकदा नवं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानच्या एका प्रसारमाध्यमासोबत बोलताना त्याने पाकिस्तान सरकारला आर्थिक बजेटमध्ये सैन्यासाठी जास्त पैशांची तरतूद करण्याबाबत आवाहन करणारं वक्तव्य केलं आहे (Shoaib Akhtar said will eat grass to increase Pakistan army budget).

“जर मला परमेश्वराने अधिकार दिले तर मी आर्थिक बजेटमध्ये पाकिस्तानी सैन्यासाठी जास्त पैशांची तरतूद करेन. त्यासाठी मला गुरांचा चारा खावा लागला तरी चालेल”, असं शोएब अख्तर म्हणाला. शोएब एवढ्यावरच थांबला नाही. “मी आर्मी चीफला माझ्यासोबत बसवून निर्णय घ्यायला सांगेन. जर पाकिस्तानी सैन्यासाठी आर्थिक बजेटमध्ये 20 टक्क्यांची तरतूद असेल तर मी 60 टक्के करेन. जर आपण एकमेकांचा आदर करणार नाही तर आपलंच नुकसान आहे”, असंदेखील तो म्हणाला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“मी देशासाठी गोळी खायला तयार होतो. 1999 साली झालेल्या कारगील युद्धात मला लढायचं होतं त्यामुळेच मी त्यावर्षी काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी नकार दिला होता”, असं शोएब अख्तरने सांगितलं (Shoaib Akhtar said will eat grass to increase Pakistan army budget).

याआधीदेखील शोएब अख्तरने अशाप्रकारचे बरेच वक्तव्य केले आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागविषयी त्याने वक्तव्य केलं होतं. “सेहवागने ‘बाप बाप असतो आणि मुलगा मुलगा असतो’, असं वक्तव्य खरंच केलं असतं तर त्याला मारलं असतं”, असं शोएब अख्तर म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावरुन भारतीय नेटीझन्सनी सोशल मीडियावर त्याला चांगलंच झोडपलं होतं.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.