IPL 2020 | ....म्हणून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी नाही, शाहिद आफ्रिदीची खदखद

आयपीएल स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.| ( Former Pakistan Captain Shahid Afridi On IPL )

IPL 2020 | ....म्हणून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी नाही, शाहिद आफ्रिदीची खदखद

इस्लामाबाद : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाला यूएईमध्ये सुरुवात झाली आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाने आपला सलामीचा सामना खेळला आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. ( Former Pakistan Captain Shahid Afridi On IPL )

आफ्रिदी नक्की काय म्हणाला ?

“आयपीएल स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. तसेच या स्पर्धेतून युवा खेळाडूंना अनुभव मिळतो. मात्र राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नाही”, असं वक्तव्य त्याने केलं आहे. पाकिस्तानच्या एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीने याबाबत विधान केलं आहे.

“आयपीएल स्पर्धा प्रसिद्ध स्पर्धेपैकी एक आहे. त्यामुळे या स्पर्धेत बाबर आझम ( Babar Azam ) सारख्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर त्यांना यातून खूप काही शिकता येईल. त्यांना दबावात आणि निर्णायक क्षणी कशाप्रकारे कामगिरी करायची, याबाबत माहिती मिळेल”, असं आफ्रिदी म्हणाला. “मात्र काही नियमांमुळे आमच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही”, अशी खंत आफ्रिदीने व्यक्त केली.

पाकिस्तानी खेळाडूंना मागणी

“क्रिकेट विश्वात होणाऱ्या इतर टी 20 स्पर्धेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यासोबतच आमच्याकडे पीसीएल (PCL) सारख्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेमुळे पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्यात असलेल्या गुणांना वाव मिळतो. तसेच त्यांना आपल्यातील कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. पीसीएलमुळे युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंचा सहवास लाभतो. जो की त्यांच्या भविष्यासाठी मोलाच ठरतो”, असं आफ्रिदीने नमूद केलं.

भारताकडून फार सन्मान मिळाला

“माझ्यावर भारतीय चाहत्यांनी फार प्रेम केलं. त्यांनी माझा नेहमीच सन्मान केला. माझं नेहमीच कौतुक केलं. मी भारतात क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला”, असंही आफ्रिदी म्हणाला. “मला आजही सोशल मीडियावर भारतातील चाहत्यांचे मेसेज येतात. भारतातील माझा अनुभव फार चांगला राहिला”, अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली.

आयपीएलच्या पहिल्या पर्वात पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. मात्र मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

पहिल्या मोसमातील पाकिस्तानी खेळाडू

आयपीएलच्या पहिल्या (IPL 2008) मोसमात पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी विविध संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यामध्ये शाहिद आफ्रिदी, युनूस खान, शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, सलमान बट, कामरान अकमल, मिस्बाह उल हक, शोएब अख्तर, सोहेल त्नवीर आणि उमर गुल यासारख्या खेळाडूंचा समावेश होता.

आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

आफ्रिदीने एकूण 27 कसोटी, 398 वनडे आणि 98 टी-20 सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीतील 27 सामन्यात त्याने 1 हजार 176 धावा केल्या आहेत. तसेच 48 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 8 हजार 64 धावा केल्या आहेत. सोबतच 395 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. तर झटपट क्रिकेट समजल्या जाणाऱ्या टी-20 मध्ये त्याने 1 हजार 405 धावा आणि 97 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Article 370 | बेटा, तू काळजी करु नको, पाकव्याप्त काश्मीरचाही मुद्दा सोडवू, गंभीरचं आफ्रिदीला उत्तर

काश्मीर मुद्द्यावरुन गौतम गंभीरने शाहीद आफ्रिदीला झाडलं

( Former Pakistan Captain Shahid Afridi On IPL )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *