IND vs NZ: न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने केली खुर्च्यांची सफाई, फोटो व्हायरल होताच खळबळ उडाली

न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूवर खुर्च्या साफ करण्याची आली वेळ, सांगितलं कारण...

IND vs NZ: न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने केली खुर्च्यांची सफाई, फोटो व्हायरल होताच खळबळ उडाली
IND vs NZ
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 19, 2022 | 7:56 AM

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यातला पहिला टी 20 (T20)सामना पावसामुळे रद्द झाला. मागच्या दोन दिवसापुर्वी तिथं हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे टॉस पडायच्या आगोदर तिथं मुसळधार पाऊस सुरु झाला होता. त्यामुळे पहिली मॅच रद्द करावी लागली. न्यूझिलंड टीममध्ये सध्या अनुभवी खेळाडू आहेत. तर टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला असून युवा खेळाडूंची टीम हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.

काल मुसळधार पाऊस मैदानात झाल्यानंतर तिथले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये मैदानातल्या काही सीट अत्यंत खराब झाल्याच्या दिसतं आहेत. न्यूझिलंडचा माजी दिग्गज खेळाडू साइमन डूल याने त्या साफ केल्या आहेत. त्यामुळे मैदानाच्या व्यवस्थापनावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

जेव्हा डूलने कॉमेंट्री परिसरातील खराब खुर्च्या पाहिल्या त्यावेळी त्याला राहावलं नाही,त्याने त्या स्वत:चं साफ करायला घेतल्या. ज्यावेळी त्याला ही अवस्था पाहावली नाही, त्यावेळी त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन राग व्यक्त केला. मी त्या सीट यांच्यासाठी साफ केल्या, कारण आमचे परदेशातली पाहुणे तिथं बसू शकतील. हा प्रकार खरंतर लाजीरवाणा आहे.

काल ज्यावेळी फोटो व्हायरल झाले, त्यावेळी सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. जगात स्वच्छ म्हणून गणल्या जाणाऱ्या न्यूझिलंड देशाची सगळीकडे फजिती व्हायला लागली. दुसरी मॅच माउंट माउंगानुई येथे होणार आहे. विशेष म्हणजे आता दोन मॅच राहिल्या आहेत, दोन्ही टीम इंडियाला जिंकणं गरजेचं आहे.